🔥 ट्रेंडिंग અગોલ પ્રાથમિક શાળાના બાળ વૈજ્ઞાનિકે વે... उमरिया जिला जेल में ई-केवाईसी एवं विधि... અરબ સાગરમાં ₹3000 કરોડના ડ્રગ્સ સાથે 5... भितरवार विधायक मोहन सिंह राठौर ने श्या... शिवपुरी मेडिकल कॉलेज के सामने से 50-60... जनता की समस्याओं का निवारण
30 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पिंपळगाव हरेश्वर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; ७५ हजारांचा संशयित मुद्देमाल जप्त, चार गुन्हे दाखल.....!!!

पिंपळगाव हरेश्वर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; ७५ हजारांचा संशयित मुद्देमाल जप्त, चार गुन्हे दाखल.....!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 30 सित. 2026, 06:40 PM 👁 11
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

पिंपळगाव हरेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, विद्युत मोटारी, महावितरण आणि सोलर केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्या भंगार व्यावसायिकांविरोधात विशेष मोहीम राबवत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी भोकरी आणि कु-हाड परिसरातील दुकानांवर छापे टाकले. या कारवाईत सुमारे ७५ हजार ४०० रुपयांचा संशयित कॉपर व अॅल्युमिनियमचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे पोलीस अधिकारी व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने हद्दीतील भंगार खरेदी-विक्री दुकानांची अचानक तपासणी केली. भोकरी व लोहार्‍याच्या हद्दीतील कु-हाड गावात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

जप्त केलेला मुद्देमाल -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
भोकरी येथील करीम नदी काकर यांच्या दुकानातून ३२ किलो कॉपर वायर - किंमत ३२ हजार रुपये
हकीम आब्बास काकर यांच्या दुकानातून १० किलो कॉपर वायर - किंमत ९ हजार रुपये
राजू उस्मान काकर यांच्या दुकानातून १४ किलो अॅल्युमिनियम तार - किंमत १ हजार ४०० रुपये
कु-हाड येथील अब्दुल हकीम काकर यांच्या दुकानातून ३२ किलो कॉपर वायर - किंमत ३२ हजार रुपये

एकूण ७५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

जप्त मुद्देमालाच्या खरेदी-विक्रीबाबत संबंधित दुकानदारांकडे बिले व इतर कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र कोणताही वैध पुरावा सादर करता न आल्याने चौघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा मुद्देमाल शेतातील चोरीच्या इतर गुन्ह्यांशी संबंधित आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईमुळे चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा संदेश गेला आहे.

ही कारवाई पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अतुल पवार, अभिजित निकम, दीपक अहिरे, प्रवीण देशमुख, भारत पाटील, शाम हटकर, मनोज वडगुजर आणि नामदेव इंगळे यांच्या पथकाने केली.
📲Get App