🔥 TRENDING દ્વારકામાં જન્માષ્ટમી: લાખો ભક્તોની સુ... ઇડરમાં ગરીબોના મકાનો પર બુલડોઝર: તંત્ર... Audio Reveals Rs 30 Lakh Extortion Pay... Srinagar Streets See BJP‑NC Clash as M... Ram Temple Trust Appoints Three New Tr... Tamil Nadu Assembly Debates Snakebite...
02 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पानशेवडीत स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर

✍️ Reporter: Shrivardhan Ananda Sonkamble 🗓 02 Sep 2026, 02:16 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पानशेवडीत स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर

पानशेवडीत स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर; मातंग-बौद्ध समाजाच्या अंत्यविधीसाठी एकाच जागेचा आधार
पानशेवडी : गावात स्वतंत्र आणि व्यवस्थित स्मशानभूमीची सुविधा नसल्याने नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पानशेवडी येथे मातंग समाज आणि बौद्ध समाजातील नागरिकांचा अंत्यविधी एकाच ठिकाणी केला जात असल्याने या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीची अधिकृत नोंदही नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी कायमस्वरूपी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात नदीला किंवा नाल्याला पूर आल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते. अंत्यविधीच्या ठिकाणी जाणे आणि मृतदेह नेणे कठीण होत असल्याने अंत्यविधी करण्यासाठी तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीय व नातेवाईकांना या परिस्थितीचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो.
कायमस्वरूपी स्मशानभूमीची मागणी
गावातील नागरिकांसाठी अधिकृतपणे स्मशानभूमीची नोंद करून सुरक्षित जागा उपलब्ध करावी. तसेच तेथे अंत्यविधीसाठी शेड, पाण्याची व्यवस्था, रस्ता आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पूर आला की अंत्यविधीसाठी प्रतीक्षा, प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पानशेवडीतील स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
📲Get App