पुण्यात येरवडा पोलिसांची मोठी कारवाई, हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, दोघांना अटक....!!
Watch on:
▶️ YouTube
पुण्यात येरवडा पोलिसांची मोठी कारवाई, हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, दोघांना अटक....!!
विभागीय प्रतिनिधी
पुणे - पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका खासगी हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने हे रॅकेट चालवले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.
बनावट ग्राहक पाठवून छापा
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. येरवडा परिसरातील एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत राज राजेशम सविता आणि सुनील शिवाजी शिंदे या दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आरोपींची कार्यपद्धती
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी फोन आणि ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत होते. ग्राहकांकडून मोठी रक्कम घेऊन ते पीडित महिलांची भेट घडवून देत होते. यासाठी महिलांवर दबाव टाकून त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलले जात होते.
गरजू महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना देहव्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वीही अनेक महिलांची फसवणूक करून त्यांना या दलदलीत ओढल्याचे तपासात उघड झाले आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या धडक कारवाईमुळे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.