🔥 ट्रेंडिंग खरगोन के माहेश्वर में निमाड़ उत्सव में... ମୋହନ ମାଝୀଙ୍କୁ କେବଳ ଦସ୍ତଖତ କରିବା ପାଇଁ ର... एन आई कि टीम पहुंची मधुबनी ଧାନ କିଣାରେ ନୂଆ ରେକର୍ଡ, ଚାଷୀଙ୍କୁ ମିଳିଛି... हत्या के विरोध में फूटा ग्रामीणों का ग़... पणजी में आयोजित होने वाला 57वाँ अंतररा...
25 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! गोळीबारानंतर कोयत्याने सपासप वार; मंदार किवळे यांचा मृत्यू

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 25 नव. 2026, 03:12 PM 👁 23
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पुणे : पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना आज (बुधवारी, २५ नोव्हेंबर) दुपारी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाबाहेर घडली. न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ काही हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार करून त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मंदार किवळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्यायालय परिसरात वकील, पक्षकार आणि नागरिकांची मोठी गर्दी असताना काही हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. काही वृत्तांनुसार, हल्लेखोरांनी घटनास्थळी बंदुका सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून तपास सुरू केला आहे.

न्यायालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

विशेष म्हणजे, न्याय मिळवण्यासाठी नागरिकांची ये-जा असलेल्या न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अशा प्रकारे गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सुप्रिया सुळे यांची गृहखात्यावर टीका

या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हल्ल्यामागील नेमके कारण काय, किती आरोपी सहभागी होते आणि या घटनेचा पूर्ववैमनस्याशी संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

पुण्यासारख्या सुरक्षित शहराची ओळख असलेल्या शहरात न्यायालयाच्या दारातच अशा प्रकारे रक्तरंजित हल्ला घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
📲Get App