🔥 TRENDING India Claims China and Pakistan Engage... Farooq Abdullah Hails Expansion of Jam... सुनील कुमार ने मुख्यमंत्री राहत कोष मे... Jammu Witnesses Protests Over Farooq A... National Conference Expands Jammu & Ka... Firing Reported at Gurudwara Gate in L...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ६४ हजारांच्या बनावट नोटा जप्त

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 27 Oct 2026, 01:54 PM 👁 66
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपी अटकेत, प्रिंटरसह साहित्य जप्त

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ६४ हजारांच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपी अटकेत, प्रिंटरसह साहित्य जप्त

पुणे जिल्हा प्रतिनिधी: 27 ऑक्टोबर 2026
पुणे शहरात बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ६४ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रिंटर, लॅपटॉप, की-बोर्ड, माऊस तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांना महात्मा फुले मंडई परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुरुवातीला एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील इतर आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती आली.

त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौघांकडून बनावट नोटा आणि त्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी बनावट नोटा कुठे आणि कोणामार्फत चलनात आणणार होते, तसेच या टोळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे पुण्यात बनावट चलनाचा गैरप्रकार करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून, प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिसांकडून सुरू आहे.
📲Get App