स्थानीय
पाईपलाईन भूमिगत टाकण्याचे काम की जनतेला वेठीस धरण्याचा ठेका? शास्त्रीपूल-डिंगणी रस्त्यावर ठेकेदाराची मनमानी*
यहाँ देखें:
📘 Facebook
🔶 तीन वर्षांपासून काम रखडले; दोन दिवसांपूर्वी माती-दगडांच्या ढिगाऱ्यावर दुचाकीस्वार कोसळला, थोडक्यात बचावला! अपघातांचा धोका, वाहनचालकांमध्ये वादावादी; नागरिकांचा संताप अनावर
*[ संगमेश्वर | ०९ नोव्हेंबर २०२६ ]*
➡️ गॅस पाईपलाईन भूमिगत टाकण्याचे काम सुरू आहे की जनतेला वर्षानुवर्षे वेठीस धरण्याचा ठेकाच घेतला आहे? असा संतप्त सवाल आता शास्त्रीपूल-डिंगणी मार्गावरील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळ या मार्गावर पाईपलाईनचे काम सुरू असून, अद्याप कामाचा शेवट दिसत नाही. विकासकामाच्या नावाखाली मुख्य रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली असून, नागरिकांना दररोज धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा आणि संबंधित प्रशासनाच्या देखरेखीचा अभाव असल्याचा आरोप आता तीव्र होत आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दुचाकी अपघाताने या निष्काळजीपणाचे गांभीर्य पुन्हा समोर आणले आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराला मोठ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशझोताचा सामना करावा लागला. समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडल्याने रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले. अशातच त्या वाहनाला बाजू देण्यासाठी दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न केला असता, खोदकामातून बाहेर काढून ठेवलेल्या माती-दगडांच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळली आणि स्वार थेट ढिगाऱ्यावर कोसळला.
या घटनेत त्याचे नशीब बलवत्तर म्हणावे लागेल. कारण बाजूलाच खोदून ठेवलेल्या उघड्या चारीत तो कोसळला असता, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. रस्त्यावर माती-दगडांचे ढिगारे ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी झटकली जात आहे का? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावर काही अपघातांच्या घटना घडल्याची चर्चा आहे. रस्ता अरुंद होणे, माती-दगडांचे ढिगारे आणि वाहनांना बाजू देण्यासाठी पुरेशी जागा नसणे यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे. वाहन बाजूला घेण्यावरून वाहनचालक आणि प्रवासी नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडल्याचे बोलले जात आहे. ठेकेदार नागरिकांच्या अडचणींना जुमानत नसल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत. दोन वर्षांपासून काम सुरू असताना नागरिकांच्या हालअपेष्टांची दखल घेण्यास ठेकेदाराला वेळ नाही का? सार्वजनिक रस्ता हा ठेकेदाराच्या मनमानीसाठी आहे की सर्वसामान्यांच्या वापरासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.
अवघ्या तासाभराच्या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. काही ठिकाणी एक ते दोन फूट खोल चिखल साचल्याने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण झाले. वाहनांचे नुकसान होण्याची भीती, प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ, इंधनाचा अपव्यय आणि अपघाताचा धोका अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल वेगळेच. खासगी ठेकेदाराच्या कामामुळे सर्वसामान्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असेल, तर या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?
कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याची कालमर्यादा निश्चित केली जाते का? या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर दोन वर्षा पेक्षा अधिक काळ काम सुरू असताना संबंधित प्रशासनाने ठेकेदाराला नेमकी किती मुदत दिली आहे? काम वेळेत पूर्ण न झाल्यास कोणती कारवाई केली जाणार? खोदकाम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक बॅरिकेट्स, सूचना फलक, रात्रीची प्रकाशव्यवस्था आणि पर्यायी मार्गाची तरतूद आहे का? की ठेकेदाराला कामाच्या नावाखाली रस्ता हवा तसा खोदण्याची मोकळीक देण्यात आली आहे?
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामाची संबंधित विभागाने किती वेळा प्रत्यक्ष पाहणी केली? ठेकेदाराला सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यास भाग पाडले का? नागरिकांच्या अडचणी आणि अपघातांच्या घटनांची दखल घेतली का? रस्त्यावरील माती-दगड हटवून धोकादायक चाऱ्या सुरक्षित करण्याचे आदेश दिले का? की कागदोपत्री देखरेख दाखवून प्रत्यक्षात ठेकेदाराला मोकळे रान देण्यात आले आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर मांडण्याची गरज आहे.
संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, ठेकेदाराला काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत द्यावी, धोकादायक ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात आणि झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाईपलाईन भूमिगत टाकण्याच्या नावाखाली रस्ता खोदायचा, माती-दगडांचे ढिगारे तसेच ठेवायचे, नागरिकांना अपघाताच्या छायेत प्रवास करायला लावायचे आणि त्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीकडे दुर्लक्ष करायचे, हाच विकासाचा नमुना आहे का? दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार थोडक्यात बचावला; उद्या एखाद्याचा जीव गेला तर जबाबदारी ठेकेदार घेणार की त्याच्यावर देखरेख ठेवणारे प्रशासन? दोन वर्षांपासून जनतेचा संयम तपासणाऱ्या या कामाला अखेर पूर्णत्वाची तारीख मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल शास्त्रीपूल-डिंगणी मार्गावरील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.