🔥 TRENDING ब्रह्मपुरी-नागभीड तालुक्यात नदीघाटांवर... बिहार में भूमि विवादों में तेज़ी, मंत्... સાવરકુંડલા માં ૯૭- સાવરકુંડલા-લીલીયા વ... ठाणे के ब्रह्मांड में ट्रक क्षतिग्रस्त... Yeh Prem Mol Liya Sees 31.5% Surge on... Ayushmann Khurrana Leads List of 5 Bol...
29 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

पंचायत समितीमध्ये जादूटोणा, अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले लिंबू आणि धमकी वजा चिट्ठी

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 23 Nov 2026, 04:00 PM 👁 309
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर मधील पंचायत समितीच्या कार्यालयात सहाय्यक अधिकारी यांच्या टेबलावर अज्ञात इसमाने काळी जादू केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला यावेळी त्यांच्या टेबलावर ठेवलेल्या पुढील मध्ये लिंबू कापलेले लिंबू त्यामध्ये हळद-कुंकू गुलाल अशा साहित्याचा वापर करून त्याखाली एक टाईप केलेली चिठ्ठी याला धमकी वजा पत्र म्हणता येईल या पत्रात असे लिहिले होते की "मी माझ्या गुरुंना कष्टात पाहू शकत नाही माझे गुरु त्यांच्या साधनेतून त्यांना मिळालेल्या सिध्दीचा वापर कोणाच्याही वाईटासाठी करणार नाहीत अगदी त्यांना कोणीही कितीही त्रास दिला तरी पण मी त्यांना असे पाहू शकत नाही त्यांना झालेल्या त्रासाच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब चुकता केला जाईल माझ्या गुरुंच्या चांगुलपणाचा तु गैरफायदा घेतलास. तुझ्यामुळे त्यांची साधना भंग झालीय. त्यामुळे त्यांच्यासह माझ्या सर्व सहकारी बंधूवर त्याचा परिणाम झालाय. ते स्वतः काही करणार नाहीत पण मी व माझे सहकारी तुला सोडणार नाही. येथून पुढे तुझे कष्टाचे दिवस सुरु झालेत. तुला जगूही देणार नाही व मरुही देणार नाही. शारिरिक व्याधींनी तुझे पुर्ण शरीर पोखरले जाईल. तुझ्या ताटातील खाणारा तयार झालाय. साम दाम दंड भेद सर्वांचा वापर होईल. आम्हाला येणाऱ्या सर्व तांत्रिक सिध्दींचा वापर होईल. येथून पुढे तुझा एकही दिवस सुखाने जाणार नाही. तु केलेल्या सर्व कृत्यांचा हिशोब घेणेची वेळ आलीय. वाईटातल्या वाईटासाठी तयार रहा सर्वनाशासाठी तयान रहा." यानंतर सदर अधिकाऱ्यांनी या गोष्टीबाबत भोर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांच्याशी त्यांनी सदर घटना घृणास्पद आणि निंदनीय घटना आहे व अशा प्रकारची जादूटोणा, काळी जादू अधिकाऱ्यांवर करणे म्हणजे एक निंदनीय बाब आहे असे सांगून आमच्या प्रतिनिधींनी येथील सीसीटीव्ही बाबत विचारले असता त्यांनी सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती दिली लवकरच सीसीटीव्ही बसवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
📲Get App