🔥 TRENDING दुर्गा माता मंदिर में 14वां विशाल जागर... Solar-powered toilet installed at Chha... Eight injured, including pregnant woma... Paan Vendor Sets Up Stall Inside 3AC C... अयोध्या दीपोत्सव આજે હારીજ ખાતે કે.પી. હાઈસ્કૂલના આદરણી...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पाचलमध्ये ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 15 Oct 2026, 10:58 PM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राजापूर तालुक्यातील पाचल येथे संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला आहे. या उपक्रमाने परिसरातील जलस्रोत पुनरुज्जीवित होण्यास मदत होणार आहे.

राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायत हद्दीतील बाजारवाडी येथे उन्हाळ्याच्या तोंडावर निर्माण होणाऱ्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत शाश्वत वाढ व्हावी या हेतूने ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या वनराई बंधारा उभारण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त श्रमदानातून हा उपक्रम राबवण्यात आला असून, यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन आगामी काळातील टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची बिकट समस्या निर्माण होते. त्यावर वेळीच उपाययोजना म्हणून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी वनराई बंधाऱ्यांची मोठी मदत होते. याच पार्श्वभूमीवर पाचल बाजारवाडी येथील नाल्यावर श्रमदानातून बंधारा बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. ग्रामस्थांनी एकत्र येत उत्साहाने श्रमदान करत हा बंधारा पूर्णत्वास नेला. या मोहिमेमुळे वाहून जाणारे पाणी अडवले गेल्याने परिसरातील जलस्रोत पुनरुज्जीवित होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

या विधायक उपक्रमाच्या प्रसंगी पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच बाबालाल फरास सर, उपसरपंच आत्माराम सुतार, राजापूर पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, स्थानिक महिला बचत गटांच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यासह ग्रामस्थ महेश रेडीज, राजेंद्र रेडीज, प्रशांत कामेरकर, विशाल भिंगार्डे, अमोल गुरव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून राबवलेल्या या जलसंधारण उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
📲Get App