Religion
पांचाळेश्वर येथे विलक्षण महापूजा
Watch on:
▶️ YouTube
पांचाळेश्वर येथे विलक्षण महापूजा
वडीगोद्री श्री पांचाळेश्वर येथे महानुभाव पंथांच्या संन्यास दीक्षा विधी आणि आश्रमाच्या उद्घाटना निमित्त शनिवार व रविवारी तारीख 24 25 त्रेतायुगी अवतार श्री दत्तात्रय प्रभू यांच्या विलक्षण महा पूजेचे आयोजन करण्यात आले आहे महापूजेस पारायण सोहळ्यात अकराशे जोड्या सहभागी होणार असल्याची माहिती श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथील परमपूज्य महंत कृष्णराज बाबा गुर्जर यांनी दिली पारायण व नामस्मरणासाठी सहभागी होणाऱ्या दांपत्यांच्या गणवेश एकसारखा असेल प्रत्येक जोडी समोर श्री दत्तात्रेय प्रभूंच्या विशेष अधिष्ठान असेल पारायण सोहळा सुरू असेपर्यंत सव्वा ते दीड तास संबंधित विशेषांवर गुलाब जलाने अभिषेक करण्यात येईल श्री दत्तप्रभूंच्या कृपाप्रसादाने अधिष्ठान झालेला विशेष संबंधित जोडीला देण्यात येईल सोहळ्यासाठी पाच देशातून विविध सुगंधी अत्तरे आणण्यात येणार आहेत पांचाळेश्वर हे श्री दत्तात्रेय महाराजांचे भोजन स्थान असे प्रसिद्ध आहे येथे दुपारी पंचवतार उपहार होणार असून त्यासाठी 11 राज्यातून विविध खाद्य पदार्थ सात राज्यातून सात प्रकारची रेशमी वस्त्रे पाच राज्यातून विविध रंगाची व सुगंधी फुले मागवण्यात आली आहे पाच प्रकारचे धातू पाच प्रकारचे रत्न आणि पाच प्रकारचे सुराधी द्रव्य देवाला समर्पित करण्यात येणार आहे या प्रकारे कार्यक्रमाचे भव्य दिव्य नियोजन करण्यात आलेले आहे