🔥 ट्रेंडिंग स्कूल शिक्षा विभाग ने एक दिन में 618 न... दौसा में 2026 पंचायती राज चुनाव की आरक... પારડી સરકારી વિજ્ઞાન કોલેજમાં રિસર્ચ ઓ... જેતડા નજીકથી નંબર પ્લેટ વિનાની કારમાંથ... रत्नागिरी: थिबा पॅलेस परिसरात मुलाला प... ભરૂચ રેલવે સ્ટેશન પર ટ્રેન મારફતે સપ્લ...
23 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जीवनशैली

NH ६१ कल्याण मुरबाड ते सावर्न्या पर्यंत बस स्टॅन्ड चा अभाव.

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 23 सित. 2026, 04:20 PM 👁 42
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले, मुरबाड तालुका रिपोर्टर किशोर पवार.मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : मुरबाड आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या मुरबाड-कल्याण मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावरील २५ बस थांब्यांवर निवारा शेड नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना ऊन-पावसात बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. आगारातही कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र निवारा शेड नसल्याने गैरसोय होत आहे.

मुरबाड तसेच शेजारील शहापूर तालुक्यातील हजारो नागरिक नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामांसाठी दररोज कल्याण, ठाणे व मुंबईकडे प्रवास करतात. मुरबाड आगाराची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे काम सुरू आहे. इतर मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगारात निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी स्वतंत्र शेड नसल्याने त्यांना ऊन-पावसाचा सामना करावा लागत आहे.
मुरबाड-कल्याण मार्गावरील किशोर, मामनोली, गोवेली यांसह अनेक ठिकाणी पूर्वी प्रवाशांसाठी निवारा शेड होत्या. मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान या शेड पाडण्यात आल्या. त्यानंतर नव्याने निवारा शेड उभारण्यात न आल्याने संपूर्ण मार्गावरील प्रवाशांची गैरसोय कायम आहे.

प्रवाशांची मागणी
प्रवाशांच्या सोयीसाठी आमदार किंवा खासदार निधीतून निवारा शेड उभारण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुरबाड-कल्याण मार्गावरील सर्व प्रमुख बसथांब्यांवर तसेच मुरबाड आगारात कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तातडीने निवारा शेड उभाराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
📲Get App