🔥 TRENDING Akali Dal Reclaims 'Lucky Charm' Moga,... Punjab CM Bhagwant Mann Slams Akali-BJ... Tata Electronics Plans Phase‑2 Expansi... Police Activity Reported in Assam, Hub... લીલીયા તાલુકામાં ઓછા વરસાદથી ખેડૂતો પર... જાફરાબાદ અજાણ્યા શખ્સે ફોન પર છેતરપિંડ...
25 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

नंदुरबारात २६ नोव्हेंबरला पेन्शनरांचा भव्य वार्षिक मेळावा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 25 Nov 2026, 01:56 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नंदुरबारात २६ नोव्हेंबरला पेन्शनरांचा भव्य वार्षिक मेळावा

नंदुरबारात २६ नोव्हेंबरला पेन्शनरांचा भव्य वार्षिक मेळावा

नंदुरबार: महाराष्ट्र राज्य पेन्शनर असोसिएशन संलग्न जिल्हा पेन्शनर असोसिएशन नंदुरबार यांच्यातर्फे पेन्शनरांचा वार्षिक मेळावा व सर्वसाधारण सभा गुरुवारी दिनांक :२६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे
हा मेळावा गांधी नगर नंदुरबार येथील पेन्शनर भवनात होणार आहे जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष डीए पाटील व सचिव एमबी पाटील यांनी केले आहे
या मेळाव्यात पेन्शनरांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे. सातवा वेतन आयोग वाढीव पेन्शन कुटुंब निवृत्ती वेतन वैद्यकीय सुविधा पेन्शन अदा करण्यातील अडचणी तसेच शासनाच्या नवीन निर्णयांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे
गेल्या वर्षभरातील असोसिएशनच्या कामाचा आढावा जमा-खर्च तसेच येत्या वर्षातील उपक्रम यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे पेन्शनरांच्या अडचणी थेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ठराव देखील मंजूर करण्यात येणार आहेत
जिल्ह्यातील पेन्शनरांसाठी हा मेळावा केवळ सभा नसून वर्षभर न भेटलेल्या सहकाऱ्यांना भेटण्याची आपले अनुभव शेअर करण्याची संधी आहे त्यामुळे सर्व पेन्शनरांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल साहेब हे सुद्धा हजर राहणार आहेत
स्थळ: पेन्शनर भवन गांधी नगर नंदुरबार
वेळ: सकाळी १०:३० वाजता
दिनांक:२६ नोव्हेंबर २०२६
📲Get App