🔥 TRENDING ‘First Christmas’ Film to Start Shooti... ‘Oka Court Case’ Spotlight on Contempo... Meghalaya aims for $16 billion economy... Bangladesh Measles Outbreak Claims 9 L... Dr. Vaidehi Taman Delves into Kashmir’... Alliance City Launches Three New Resid...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नशिराबाद प्रवेशद्वाराजवळ पुन्हा अपघाताचा थरार; सिलेंडर ट्रकची मालवाहू वाहनाला धडक....!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 28 Sep 2026, 04:20 PM 👁 10
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी


नशिराबाद : शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सिलेंडरने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या छोट्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याची घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली. या अपघातात ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियमचा सिलेंडरने भरलेला ट्रक जळगावच्या दिशेने जात होता. नशिराबाद शहराजवळ रस्त्याच्या कडेला डिझेल संपल्यामुळे एक छोटे मालवाहू वाहन बंद अवस्थेत उभे होते. याचवेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता एवढी होती की, छोट्या मालवाहू वाहनाला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्यावरील डिव्हायडरवरील बॅरिकेड्स तोडून सर्व्हिस रोडलगतच्या शेतात घुसला. त्यानंतर ट्रक तेथे थांबला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्ता मोकळा केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू केला आहे.
📲Get App