🔥 ट्रेंडिंग कनक न्यूज़ ने 13 सितंबर 2026 को दोपहर... कनक न्यूज़ का 13 सितंबर 2026 को 3 बजे... कनक न्यूज़ ने 13 सितंबर 2026 को 7 बजे... मुख्यमंत्री ने पवन के लौटने पर भेजा गर... आंध्र प्रदेश में डेयरनेस अलाउंस 41.86%... হাওড়ার ফুটপাতে প্রকাশিত চলছে মাদক সেব...
13 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नाशिकमधून ४०२ गुंडांची हकालपट्टी; गणेशोत्सवापूर्वी पोलीस आयुक्तांचा मोठा दणका

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 13 सित. 2026, 10:18 PM 👁 22
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
....!

विभागीय प्रतिनिधी

नाशिक | गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने शहरातील तब्बल ४०२ सराईत आणि उपद्रवी इसमांना २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत नाशिक शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कायद्याला आव्हान देणाऱ्यांची आता खैर नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईत सर्वात जास्त चाप हा औद्योगिक आणि विस्तारित उपनगरांना बसला आहे. शहराच्या जुन्या मध्यवर्ती भागाचा समावेश असलेल्या परिमंडळ-१ च्या तुलनेत कामगार आणि औद्योगिक पट्टा असलेल्या परिमंडळ-२ मध्ये पोलिसांनी सर्वाधिक धडक कारवाई केली आहे.

एकूण ४०२ पैकी २७५ म्हणजेच ६८.४१% कारवाया एकट्या परिमंडळ-२ मध्ये झाल्या आहेत. यामध्ये सातपूर - ५३, उपनगर - ४६ आणि अंबड - ४० या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुंडांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

दरम्यान, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि वाढीव गस्तीद्वारे पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.

पोलीस ठाणेनिहाय कारवाईचा लेखाजोखा

परिमंडळ - १ (एकूण १२७) - उपायुक्त मोनिका राऊत
मुंबईनाका - ३१, भद्रकाली - २४, पंचवटी - २२, गंगापूर - २२, सरकारवाडा - ११, म्हसरूळ - १०, आडगाव - ०७

परिमंडळ - २ (एकूण २७५) - उपायुक्त किशोर काळे
सातपूर - ५३, उपनगर - ४६, नाशिकरोड - ४२, अंबड - ४०, इंदिरानगर - ३६, देवळाली कॅम्प - ३३, एमआयडीसी - २५
📲Get App