🔥 TRENDING મોરની સારવાર: મેહુલભાઇ સિંધવાની મદદથી... મુખ્‍યમંત્રીએ જળબમ્બાકારમાં પાણીમાં ઉત... Bansuri Swaraj Accuses Congress of Cor... Indravati Tiger Reserve to welcome tou... ED arrests former OSD of Chhattisgarh... Bihar Daroga Recruitment Protest Turns...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मध्यप्रदेशात जाऊन कासोदा पोलिसांची कारवाई

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 15 Sep 2026, 03:51 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शेतातून शेळ्या बोकड चोरणारी टोळी जेरबंद

विलास पाटील

शेतातून शेळ्या-बोकड चोरणारी टोळी अखेर जाळ्यात!
कासोदा : शेतातून १० शेळ्या व बोकड चोरीस गेल्याप्रकरणी कासोदा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे.फिर्यादी शेतकरी सुरेश क्षिरसागर यांच्या गट नं. ४४५/१ मधील शेतातून दि. ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेळ्या चोरून नेल्या होत्या.

API श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडी गाव ता. भगवानपुरा येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक आरोपी :-१) अजय राजू चव्हाण, रा. साईखेडी
२) सोहन विश्राम ब्राम्हणे, रा. बडी, जि. खरगोन (म.प्र.)

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीसाठी वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. उर्वरित मुद्देमाल व इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अशोक नखाते, DySP विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI किशोर पाटील, पोहेकॉ किरण गाडीलोहार, पो कॉ योगेश पाटील यांनी केली.

कासोदा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
📲Get App