🔥 TRENDING दिल्ली के टोल प्लाज़ा के पास रहने वाले... दिल्ली में निर्यातकों के लिए एक्सपोर्ट... पश्चिम बंगाल‑बांग्लादेश सीमा पर फेंसिं... पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ६४ ह... मालाबार गोल्ड शोरूम पर ग्राहक के स्वर्... રાજકોટમાં ફ્લોરેન્સ વેલનેસ સ્પાની આડમા...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मंद्रूपमध्ये जागेच्या वादातून जातिवाचक शिवीगाळ; दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल! साफसफाईच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप; कुऱ्हाडीने मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद.

✍️ Reporter: Yallappa Rayagond Ragate 🗓 27 Oct 2026, 12:30 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मंद्रूपमध्ये साफसफाईच्या कामात अडथळा आणून जातिवाचक शिवीगाळ; दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
मंद्रूप : साफसफाईच्या कामात अडथळा आणून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मंद्रूप येथील दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघेश महादेव म्हेत्रे आणि रवी महादेव म्हेत्रे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास मंद्रूप येथील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १५७३ येथे ही घटना घडली. फिर्यादी रवींद्र आडवेळप्पा कांबळे (वय ३३) हे आपल्या काका व चुलत भावांसह साफसफाईचे काम करीत होते.
यावेळी आरोपी दुचाकीवरून घटनास्थळी आले आणि त्यांनी सुरू असलेल्या कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जातिवाचक शिवीगाळ करून कुऱ्हाडीने मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद देण्यात आली आहे.
या प्रकरणी मंद्रूप पोलिसांत दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी रात्री मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२(२), ३५२(३), ३५२ आणि ३(५), तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, सोलापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप पुढील तपास करीत आहेत.
📲Get App