🔥 TRENDING The Hindu Releases October 16, 2026 Mo... कलियर के गेस्ट हाउस में मुजफ्फरनगर यूट... Uttarakhand Minister Claims Husband Co... Delhi to Allow Limited CJP Protest Ami... 30-foot cockroach effigy to be burned... Delhi Traffic Advisory: 21 Roads Close...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मत दार यादी त नाव नोंदणी व दुरुस्ती शिबीराचे आयोजन.

मत दार यादी त नाव नोंदणी व दुरुस्ती शिबीराचे आयोजन.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 16 Oct 2026, 11:42 AM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
ठाणे मुरबाड विशेष वृत्त
दिनांक १६/१०/२०२६
मुरबाड :
*राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य #निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.*

या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. *नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने दि २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत,* असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन व मदत करतील .

*मतदार यादीत नाव समावेशन करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरता येतो.*

*मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ वापरावा.*

*तसेच निवासस्थानातील बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो.*

मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती ही वर्षभर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र नवीन मतदार किंवा प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येईल. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासून आवश्यक अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादी तपासणे, नमुना अर्ज क्रमांक ६ भरणे किंवा नोंदणी प्रक्रियेसंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्राशी संपर्क साधता येईल.

जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

*पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.*
📲Get App