🔥 TRENDING Palampur photographer Archit Sood gain... Richa Chadha and Ali Fazal Marry in Th... Actor Kamal Haasan Rebukes Elon Musk O... Top 5 Feel‑Good Nivin Pauly Films to W... Hanuman Ansh Completes 64th Day in The... Election Commission criticised for not...
10 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मराठी चित्रपट इंडस्ट्री बचाव आंदोलन साठी प्रतिष्ठित कलाकार श्रीयुत विजय पाटकर सर यांचा पाठिंबा

मराठी चित्रपट इंडस्ट्री बचाव आंदोलन साठी प्रतिष्ठित कलाकार श्रीयुत विजय पाटकर सर यांचा पाठिंबा

✍️ Reporter: Rahul Baburao Borhade 🗓 09 Oct 2026, 11:44 PM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

प्रतिष्ठित कलाकार श्रीयुत विजय पाटकर सर यांची ग्रेट भेट

प्रेस नोट
*मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी ३६ जिल्ह्यांतील कलाकारांची ऐतिहासिक एकजूट; ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्याशी दादर येथे महत्त्वाची बैठक संपन्न!*
मुंबई, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६:
‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचावा आंदोलन’ (MFIBA) अंतर्गत आज दादर येथे एक अतिशय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. "संस्कृतिः संरक्षणम्, कलायाः संवर्द्धनम्" आणि "मराठी चित्रपट, आपली अस्मिता!" या मुख्य उद्दिष्टांना समोर ठेवून, मराठी चित्रपटसृष्टीच्या सद्यस्थितीवर व तिच्या विकासावर चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांची भेट घेतली.
या बैठकीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ३६ जिल्ह्यांतील कलाकार एकत्र येत मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी नवा संकल्प केला. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी उपस्थित कलाकारांना मार्गदर्शन करत योग्य दिशा, भक्कम एकजूट आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा दिली.
यावेळी मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध आव्हाने, कलाकारांचे प्रश्न आणि उद्योग टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. याच अभियानाचा एक भाग म्हणून २ मिनिटांची अभिनय स्पर्धा, कलाकारांमधील विचारांची देवाणघेवाण आणि आगामी काळात एकत्रितपणे शासनासमोर सादर करता येईल असा एक प्रभावी उपक्रम तयार करण्याचे नियोजन करण्यात आले.
कारकारणी व पदाधिकारी:
*अध्यक्ष: प्रसाद इंगोले*
*उपाध्यक्ष: हर्षल पाटील*
*कार्याध्यक्ष: सचिन पिंपरीकर*
उपस्थित पदाधिकारी, मान्यवर व कलाकार:
*सतीश आंबर्डेकर, गणेश तळेकर*, श्रीकांत उमरीकर, किरण बीडकर, अमोल निरगुडे, उत्तम जगन्नाथ महाजन, अतुल कुडवे, उमेश पंडित, गणेश (अण्णा) भालेराव, प्रशांत रमेश बेगम, किरण कुडाळकर, प्रदीप स्वामी, राजु माने पाटील, राहुल बाबुराव बोऱ्हाडे, रामदास (राम) जाधव, अंजयन सचिन आणि सीमा आहेर हे मान्यवर व कलाकार या बैठकीस उपस्थित होते.
मराठी चित्रपटांचे जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या हक्कासाठी हे आंदोलन पूर्णपणे कटिबद्ध आहे. "आपले योगदान आपल्या चळवळीला शक्ती देते" या भावनेतून सर्व उपस्थितांनी या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
– *मराठी फिल्म इंडस्ट्री बचावा आंदोलन (MFIBA)*
📲Get App