🔥 TRENDING మన తణుకులో యువకుడు ఆత్మహత్య. Yami Gautam Urges Public to Stop Using... અમદાવાદ: રથયાત્રાના રૂટ પર ગેરકાયદે બા... Aishwarya Rai Responds to Brad Pitt-An... Mukesh Khanna Announces Comeback with... BotTala’s ‘Sokhi Rongomala’ Returns to...
04 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मराठी अभिजात भाषा दिन उत्साहात साजरा

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 04 Oct 2026, 05:02 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले

मराठी अभिजात भाषा दिन साजरा
सौ सु गि पाटील माध्यमिक विद्यालय,सौ जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यास क्रम भडगांव येथे
" मराठी अभिजात भाषा दिन" उत्साहात साजरा करण्यात आला वांग्मय समिती आणि आनंदीदायी शनिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयो जन करण्यात आले होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक /प्राचार्य श्री अजय अहिरे यांच्या मार्ग दर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अभिजात मराठी भाषा दिनाचे उत्कृष्ट फलक लेखन विद्या लयाचे ज्येष्ठ कला शिक्षक श्री चेतन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरु वातीला ज्येष्ठ शिक्षक श्री देवेंद्र पाटील यांनी" मराठी मायबोली" याबद्दल विद्यार्थ्यांना मार्ग दर्शन केले. मराठी भाषा अधिक समृद्ध होऊन तिच्या संशोधन कार्यात अधिक गती यावी याबद्दल मार्गदर्शन केले विविध उदाहर णांद्वारे मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अशोक तायडे यांनी विद्या र्थ्यांना मराठी भाषेचा आणि आपल्या बोलीभाषा म्हणजे काय याबद्दल संबंध वेगवेगळ्या उदाहर णांद्वारे सांगून विद्या र्थ्यांच्या मनात आप ल्या मायबोली बद्दल अधिक अभिमान वृद्धिंगत केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उप मुख्याध्यापिका श्रीमती छाया बिऱ्हाडे यांनी मराठी भाषेला केंद्र शासना कडून अभिजात दर्जा कसा प्राप्त झा ला आणि त्याबद्दल दिले जाणारे पुरस्कार याबद्दल माहिती सांगून संशोधन आणि वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी आणि त्याद्वारे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा. हा या मागचा उद्देश स्पष्ट केला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी "माय मराठी "या कवितेचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वांग्मय समितीच्या प्रमुख श्रीमती प्रज्ञा देशमुख आणि आनंदीदायी शनिवा रच्या प्रमुख श्रीमती माया देशमुख आणि श्रीमती मीनल पवार यांनी विद्यालयातील समृद्ध ग्रंथालयातील सर्व लेखकांचा परिचय थोडक्यात करून दिला आणि कार्यक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App