🔥 ट्रेंडिंग भोर - अजंदा मार्गावरील ५० हजारांच्या व... एनडीएमसी ने बीजेपी के तिरंगा मार्च के... हाईकोर्ट ने इंदौर में अवैध पंडाल को रो... दमोह अदालत ने मंजूर आलम को 42 लाख 46 ह... Banihal Baramulla train service suspe... सीबीआई ने 1 करोड़ की रिश्वत के मामले म...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाडमध्ये 'संकल्प अभियान' अंतर्गत तालुका स्तरीय शिबिर संपन्न; आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना
सरकारी योजना

मुरबाडमध्ये 'संकल्प अभियान' अंतर्गत तालुका स्तरीय शिबिर संपन्न; आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 15 अक्टू. 2026, 07:08 PM 👁 18
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड दिनांक १६/१०/२०२६
मुरबाड जि ठाणे विशेष वार्ता पत्र
मुरबाडमध्ये 'संकल्प अभियान' अंतर्गत तालुका स्तरीय शिबिर संपन्न; आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप
मुरबाड:
महाराष्ट्र शासनाच्या ‘संकल्प अभियान’ अंतर्गत उपविभागीय महसूल अधिकारी कल्याण आणि तहसीलदार कार्यालय मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका भव्य तालुका स्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय कार्य सम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या गरजू लाभार्थ्यांना दाखले आणि प्रमाणपत्रांचे थेट जागेवरच वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांची कामे एकाच छताखाली व्हावीत यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार कथोरे यांनी सांगितले.
याप्रसंगी स्थानिक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी श्री. सुभाषजी पवार, उल्हासजी बांगर, प्रकाश पवार आणि सुहास मोरे यांच्यासह परिसरातील अनेक सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मिळून नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाडचेमाननीय तहसीलदार श्री. अभिजित देशमुख साहेब, त्यांचे सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत मोलाhची भूमिका बजावली. प्रलंबित अर्ज निकाली काढून गरजू लाभार्थ्यांपर्यंत थेट शासकीय लाभ पोहोचवल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी महसूल प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले.अश्या प्रकारे कार्यक्रमांची सांगता यशस्वी प्रकारे झाली
📲Get App