🔥 ट्रेंडिंग भोर तालुक्यात दोन अल्पवयीन चुलत भावांक... केंद्र ने आंध्र प्रदेश के सेमीकंडक्टर... ग्राम पंचायत बिड़ला में कमला देवी गुर्... एंड्रप्रदेश-यानम तट पर गंभीर चक्रवात क... गुजरात आकर्षित निवेशक, भारत के बाजार क... ਚਾਕਲੇਟ ਖ਼ਾਣ ਦੇ ਸ਼ੌਕੀਨ ਹੋ ਜਾਓ ਸਾਵਧਾਨ ! ਬ...
25 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जीवनशैली

मुरबाडमध्ये जलसंधारणाच्या कामाला गती; विविध ग्रामपंचायतींमध्ये २५ ते ३० बंधाऱ्यांची कामे पूर्ण.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 25 अक्टू. 2026, 12:31 PM 👁 48
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाडमध्ये जलसंधारणाच्या कामाला गती; विविध ग्रामपंचायतींमध्ये २५ ते ३० बंधाऱ्यांची कामे पूर्ण.
मुरबाड ठाणे :
दिनांक २५/१०/२०२६.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यात जलसंधारणाच्या कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरू आहे.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे. तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड

नीड २४न्यूज
विशेष वृत्त ठाणे मुरबाड ::
October २५/१०/२०२६.
भूजलपातळीत वाढ करण्यासाठी मुरबाड तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे.
ठाणे : राज्यात असलेली पाण्याची कमतरता आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर विनियोग करण्यासह भूजलपातळीत वाढ करण्यासाठी मुरबाड तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये वनराई बंधारे उभारण्यावर भर देण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे २५ ते ३० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आगामी काळात तालुक्यात १०० ते १५० वनराई बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासह ग्रामीण भागातील जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यात जलसंधारणाच्या कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरू आहे. फांगुळगव्हाण, तळेगाव, जडई, मेर्दी, वल्हिवरे, धसई एकलहरे, भोंरांडे आणि दहिगाव चा. यांसह विविध ग्रामपंचायतींमध्ये वनराई बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आतापर्यंत २५ ते ३० बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जलसंधारणाची कामे व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार १०० ते १५० वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुरबाडच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी दिली.
जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न
अनियमित पाऊस आणि उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेता, ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे करणे आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीसोबतच स्थानिक गरजांनुसार जलसंधारणाची कामे हाती घेऊन त्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने उपक्रम
मुरबाड तालुक्यात नियोजित वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर पावसाच्या पाण्याचा स्थानिक पातळीवर अधिकाधिक उपयोग करून घेण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. भूजलसाठ्याचे संवर्धन, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर भर दिल्यास ग्रामीण भागातील जलसुरक्षेला बळ मिळू शकते. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून मुरबाड तालुक्यात जलसंधारणाची कामे अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न.
📲Get App