🔥 TRENDING PM Modi to Inaugurate Neetish Setu in... Knife Attack on Police Officer in Jaba... Madhya Pradesh BJP Revamps Structure,... UPSC Sends Three Names for Madhya Prad... Congress rebounds in Rajasthan Panchay... ಗ್ರಾಮ ಸಂಪರ್ಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ: ಗಡಿಭಾಗದ ಜನರಿಗೆ...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मुरबाडमध्ये जुगल जाखोटीया यांच्या गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 20 Nov 2026, 09:56 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
दिनांक २१/११/२०२६
विशेष वृत्त
ठाणे मुरबाड (प्रतिनिधी) :
मुरबाड शहरातील उद्योजक जुगल जाखोटीया यांच्या गोडाऊनला आज (दि. २०) रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूडसाठा असल्याने लाकडाने भरपूर पेट घेतला असून, आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोडाऊनमधून अचानक धूर आणि आगीचे लोट बाहेर येताना दिसताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या लाकडांनी भरपूर पेट घेतल्याने आगीची तीव्रता प्रचंड वाढली आणि परिसरात धुराचे मोठे साम्राज्य पसरले. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लाकूडसाठा जळून खाक झाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
📲Get App