🔥 TRENDING Three staff suspended after Class 9 tr... Two Killed as Torrential Rains and Thu... Man impersonating IAF officer cheats G... Gujarat CM launches 30 electric buses... Gujarat Villagers Use Mangroves as Nat... Coastal Karnataka prepares for Gauri‑G...
13 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाडमध्ये आमदार किसनजी कथोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा;
Health

मुरबाडमध्ये आमदार किसनजी कथोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा;

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 13 Sep 2026, 06:20 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाडमध्ये आमदार किसनजी कथोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा; १७ गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १८ हजारांची मदत!मुरबाड:मुरबाड तालुका दुय्यम शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार किसनजी कथोरे यांचा वाढदिवस शनिवारी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मुरबाड येथे अत्यंत अनोख्या आणि सामाजिक भान जपत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.ढोल-ताशे, लेझीम अन् १११ आरत्यांनी अभूतपूर्व स्वागतकार्यक्रमस्थळी आमदार किसनजी कथोरे यांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे आणि लेझीम पथकाच्या निनादात त्यांचे उत्साही स्वागत केले. कथोरे यांना दीर्घायुष्य लाभो, या प्रार्थनेसह महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी १११ आरत्यांनी त्यांचे औक्षण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आमदारांच्या जीवनपटावर आधारित पारंपरिक व स्तुतीगीते सादर करून कार्यक्रमात मोठी रंगत आणली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर केक कापून वाढदिवसाचा मुख्य सोहळा पार पडला.पत्रकार शेलार दाम्पत्याकडून १७ विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी जमाया सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार कुणाल शेलार यांच्या पत्नी सौ. मयुरी कुणाल शेलार यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी शाळेतील १७ आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एकूण १८ हजार रुपयांची शैक्षणिक फी महाविद्यालयाचे प्राचार्य राकेश पाडवी यांच्याकडे सुपूर्द केली. शेलार दाम्पत्याच्या या उल्लेखनीय आणि कौतुकास्पद सामाजिक कार्याचे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.आमदार कथोरे यांनी मानले आभारआपला वाढदिवस अशा पद्धतीने विधायक कामांनी साजरा केल्याबद्दल आमदार किसनजी कथोरे भारावून गेले. त्यांनी संस्थेचे सचिव किसन चौधरी, प्राचार्य राकेश पाडवी, उपप्राचार्य कराळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मनापासून आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
📲Get App