🔥 ट्रेंडिंग महिंद्रा 265 DI XP Plus बनाम OJA 3132:... हिमाचल प्रदेश देगा 19‑27 वर्ष के विधवा... इंदौर के एमटीएच अस्पताल में सीनियर डॉक... મોડાસા, છત્રેશ્વરીમાં વીજળી માટે વલખા... अतीक अहमद के बेटे अली अहमद का जिंसी जे... કચ્છના અનેક વિસ્તારોમાં વીજપુરવઠો ખોરવ...
21 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुक्यातील प्रतिष्टीत असलेली सरळगाव ग्रामपंचायत ची ग्राम सभा, ग्रामस्थांनी गाजवली.
राजनीति

मुरबाड तालुक्यातील प्रतिष्टीत असलेली सरळगाव ग्रामपंचायत ची ग्राम सभा, ग्रामस्थांनी गाजवली.

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 31 अग. 2026, 05:56 PM 👁 289
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सरळगाव ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचे तीव्र ठिय्या आंदोलन; रस्ता, पाणी आणि घरकुलाच्या प्रश्नांवर महिला आक्रमकNeed 24न्युजकाशिनाथ देसले, जिल्हा रिपोर्टर, ठाणेदिनांक: ३१/०८/२०२६मुरबाड: तालुक्यातील सरळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाई आणि कारभाराविरोधात आज स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. "रस्ता, पाणी आणि घरकूल" या मूलभूत हक्कांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामध्ये गावातील महिलांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सरळगावातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि हक्काच्या घरकुल योजनेच्या मंजुरीतील दिरंगाई यामुळे ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने अखेर आज संतप्त ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले.या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला धारेवर धरले. "आमच्या हक्काचे पाणी, रस्ते आणि घरकूल आम्हाला मिळालेच पाहिजेत," अशा घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला.आंदोलक महिलांचे थेट म्हणणे:आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, "निवडणुका आल्या की नेते आणि अधिकारी आश्वासन देतात, पण प्रत्यक्ष कामाच्या वेळी आमची फसवणूक होते. रस्त्यांवर खड्डे पडलेत, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आणि हक्काच्या घरकुलासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे. आता केवळ आश्वासनांवर आम्ही मागे हटणार नाही."प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया:आंदोलनाची तीव्रता पाहता संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन सांगितले की, "तांत्रिक अडचणींमुळे घरकुल मंजुरीला काहीसा वेळ लागला आहे. रस्ते दुरुस्ती आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न येत्या काही दिवसांत प्राधान्याने सोडवला जाईल. यासाठी निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल."प्रमुख मागण्या:१. सरळगाव अंतर्गत मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे.२. गावात नियमित आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.३. प्रधानमंत्री आणि राज्य गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या सर्व घरकुलांना तात्काळ मंजुरी देऊन हप्ते जमा करावेत.जोपर्यंत जबाबदार अधिकारी घटनास्थळी येऊन ठोस लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे सरळगाव परिसरात आज दिवसभर राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
ग्रामपंचायती च्या प्रागणात परत ग्राम सभा बोलावून पंचायत समिती मुरबाड चे विस्तार अधिकारी श्री यादव गायकवाड निरीक्षक म्हणून नियुक्ती केले आणि तंटा बखेडा होऊ नये यासाठी सरळगाव चे पोलीस पाटील श्री भाऊ घुडे आणि पोलीस नायक श्री वाय ए तडवी बॅच नं 580पोलीस स्टेशन मुरबाड तालुका यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
ग्रामपंचायत सरळगावातील श्री वाघमोडे ग्रामसेवक यांनी आपल्या कर्मचाऱ्याकडून (अजंठा),विषय पत्रिका
वाचून त्याच विषयावर चर्चा करून माहिती दिली,ग्रामस्थांनी, विषया नुसार चर्चेचा आग्रह धरला.
घरकुल यादीतील तांत्रिक दुरुस्त्या करून अंतिम यादी करण्याचे ठरले,
ग्राम विकास कामना आराखड्यात घ्यावे, त्याच प्रमाणे जलजीवन मिशन चे विश्रुत माहिती झालेला खर्च आणि स्वच्छ
पाणी नियोजन या बाबत चर्चा झाली.
शेवटी अध्यक्षा प्रशासक सविता वसंत एगडे यांच्या सूचनेनुसार
सर्वांचे आभार मानून सभा संपवली.
📲Get App