🔥 TRENDING Mizoram hockey team to receive hero’s... Mizoram Yet to Receive Central Scheme... BJP Sets Sights on Mizoram Government... અગ્રણી નેતા શ્રી દિલીપભાઈ સંઘાણી સાહેબ... குடியாத்தத்தில் ரோட்டரி சங்கம் நடத்திய... શ્રીમતી એચ.બી .સંઘવી મહિલા આર્ટસ તથા ક...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

मुरबाड तालुक्यातील महिलांना 'महिला शेतकरी प्रमाणपत्र' नोंदणी करण्याचे आवाहन

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 03 Oct 2026, 10:50 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्यातील महिलांना 'महिला शेतकरी प्रमाणपत्र' नोंदणी करण्याचे आवाहन.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक ३/१०/२०२६.
मुरबाड:
महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना हक्काचे अधिकार मिळवून देण्यासाठी शासनामार्फत 'महिला शेतकरी प्रमाणपत्र' योजना राबविण्यात येत आहे. मुरबाड तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले आहे.
या प्रमाणपत्राच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार असून, शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग अधिक मजबूत करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्राचे मुख्य फायदे:
• ₹२ लाखांचा मोफत विमा: नोंदणीकृत महिला शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण दिले जाते.
• कृषी योजनांचा लाभ: कृषी विभागाच्या सर्व शासकीय योजनांमध्ये प्राधान्य आणि लाभ मिळतो.
• ७/१२ नसला तरी प्रमाणपत्र: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर महिलेच्या नावावर स्वतःचा सातबारा (७/१२) नसेल, तरीही प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांना हे प्रमाणपत्र दिले जाते.
• शेतमजूर व भूमिहीन महिलांना संधी: शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या किंवा भूमिहीन असणाऱ्या महिला देखील या प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
१. आधार कार्ड
२. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
मुरबाड तालुक्यातील सर्व पात्र महिलांनी, शेतमजुरांनी आणि भूमिहीन भगिनींनी आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून हे महिला शेतकरी प्रमाणपत्र काढून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आवाहन २४न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
📲Get App