Lifestyle
मुरबाड तालुक्यातील खुटल बारागाव ग्रामपंचायतीची ग्राम सभा घरकुल योजने ने गाजली
घरकुल योजनेतून गरिबांना डावलले; खुटल ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचा यादीवर तीव्र आक्षेपनीड २४ न्यूजजिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसलेमुरबाड, दिनांक २ ऑगस्ट २०२६:मुरबाड तालुक्यातील खुटल (बा.) ग्रामपंचायतीअंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीवरून ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ग्रामसभेत एकूण ३२५ घरकुलांसाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, या यादीत आधीच पक्की घरे असलेल्या श्रीमंत व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली असून, प्रत्यक्षात स्वतःचे घर नसलेल्या आणि हक्काच्या निवार्याची गरज असलेल्या गरीब कुटुंबांना सर्वेक्षण यादीतून पद्धतशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, संगणक परिचालक आणि रोजगार सेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या नातेवाईकांसह मर्जीतल्या व्यक्तींचा घरकुलासाठीच्या सर्वेक्षणात समावेश केल्याचा खळबळजनक आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेच्या संपूर्ण प्रक्रियेवरच ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी 'भूमिपुत्र एल्गार संघटनेचे' ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव यांची भेट घेऊन लेखी तक्रार मांडली. यानंतर संघटनेच्या वतीने पंचायत समिती मुरबाड येथे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. लाभार्थी यादीची तात्काळ फेरतपासणी करावी, प्रत्येक लाभार्थ्यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी (भौतिक पडताळणी) करावी, पक्के घर असलेल्यांची नावे यादीतून वगळावीत आणि हक्काचे घर नसलेल्या खऱ्या गरजू कुटुंबांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.या आंदोलनाची दखल घेत गट विकास अधिकारी (BDO) लता गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. प्रशासनाकडून योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर अखेर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी आता प्रशासन दोषींवर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. Need 24जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
दिनांक 2/09/2026.
दिनांक 2/09/2026.