🔥 ट्रेंडिंग শিক্ষাব্রতী সৈয়দ আব্দুর রাজ্জাকের স্ম... 2=4 लुधियाना में नकली नोटों के साथ दो संदि... सुप्रीम कोर्ट ने दिवाली पर 'ग्रीन' पटा... बिहार बोर्ड ने 2027 की मैट्रिक‑इंटर वा... इंदौर: अभ्यास मंडल ने विद्यार्थियों के...
02 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

मुरबाड तालुक्यात श्रमदानातून वनराई बंधारा; कृषी विभाग व ॲग्रो डीलर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 02 नव. 2026, 05:32 PM 👁 8
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
दिनांक: ०२/११/२०२६
विशेष वृत्त: धसई, सोनवळे, मुरबाड
मुरबाड तालुक्यात श्रमदानातून वनराई बंधारा; कृषी विभाग व ॲग्रो डीलर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी: काशिनाथ देसले, ठाणे
तालुका प्रतिनिधी: किशोर पवार, मुरबाड
मुरबाड:
दिनांक २/११/२०२६.
तालुक्यातील मौजे सोनवळे येथे मुरबाड तालुका ॲग्रो डीलर असोसिएशन व तालुका कृषी विभाग मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या या सामूहिक उपक्रमाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.
या समाजोपयोगी कार्यक्रमाला ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक श्री. रामेश्वर पाचे साहेब आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. बाचोटीकर साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा वनराई बंधारा यशस्वीपणे बांधण्यासाठी मुरबाडचे तालुका कृषी अधिकारी श्री. गायकवाड साहेब, तालुका गुण नियंत्रण निरीक्षक श्री.रामचंद्र घुडे साहेब, मंडळ कृषि अधिकारी श्री. संदीप केणे साहेब आणि कृषी सहायकअधिकारी श्री. शरद म्हाडसे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. कृषी विभागाच्या या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदानात सहभाग घेतला.
बंधाऱ्याच्या उभारणीत तालुका डीलर ॲग्रो असोसिएशनचे पदाधिकारी श्री. जयवंत हरड आणि श्री. रवींद्र विशे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच कृषी विक्रेते श्री. विजय भोईर, श्री. कैलास भोईर, श्री. विकास वारघडे, श्री. चिंतामण वारघडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्या बंधूंनी एकत्र येत मोलाचे सहकार्य केले.
शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या उपक्रमामुळे मौजे सोनवळे व परिसरातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. स्थानिक पातळीवर राबवण्यात आलेला हा जलसंधारणाचा प्रयोग इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
📲Get App