🔥 ट्रेंडिंग जिला परिषद अलवर के वार्ड नंबर 34 से प्... Today match जमुई में दुर्गा पूजा को लेकर पुलिस अलर... जैथरा में भाजपा प्रदेश मीडिया पैनलिस्ट... नवादा में फर्जी वेतन एरियर भुगतान मामल... હિંમતનગર નજીક વીજળીના ધાંધિયા: વેપારીઓ...
14 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांकडून करपलेल्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी; रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषि

मुरबाड तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांकडून करपलेल्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी; रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 14 अक्टू. 2026, 10:06 PM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांकडून करपलेल्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी; रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
ठाणे/मुरबाड विशेष वृत्त:
नीड २४न्यूज वृत्तसेवा
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले (ठाणे)
तालुका रिपोर्टर: किशोर पवार (मुरबाड)
दिनांक: १५/१०/२०२६
मुरबाड:
मुरबाड तालुक्यातील भातशेतीचे पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, पिके करपल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल, १४ ऑक्टोबर रोजी कोकण विभागातील उच्च पदस्थ कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसान पाहणी केली आणि पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पावसाअभावी भात पिके करपली; बिरवाडी व आंबेळे गावात पाहणीmh
कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौजे बिरवाडी, मासले आणि आंबेळे या गावातील भात शेती क्षेत्राला प्रत्यक्ष भेट दिली. पावसाने दगा दिल्यामुळे अनेक ठिकाणी भात पिके पूर्णपणे करपून गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. आंबेळे येथील शेतकरी बांधवांनी पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांसमोर मांडले. या दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकरी बांधवांसोबत सध्याच्या पीक परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.
'घे उंच भरारी' महिला शेतकरी गटाला भेट अन् रब्बीचे नियोजन
या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी मासले गावातील 'घे उंच भराmरी महिला शेतकरी गट' या महिलांच्या शेती गटाला विशेष भेट दिली. महिला शेतकऱ्यांच्या कामाची माहिती घेत अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच, खरीप हंगामातील नुकसानातून सावरण्यासाठी पुढील रब्बी हंगामात कोणत्या पिकांचे कसे नियोजन करावे, याबाबत महिला शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कृषी विभागाचे मोठे अधिकारी दौऱ्यावर उपस्थित
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात कोकण विभाग ठाणे चे अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बालाजी ताटे सर, कृषी अधिकारी श्री. संजय घुडे सर, मुरबाडचे तालुका कृषी अधिकारी श्री. अशोक गायकवाड सर, आणि मंडळ कृषी अधिकारी श्री. संदिप केणे सर प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यांच्यासोबत उप कृषी अधिकारी (किशोर) श्री. समाधान शिवशरण साहेब, पाणी फाउंडेशन मुरबाडचे तालुका समन्वयक श्री. काशिनाथ सुरोसे, सहाय्यक कृषी अधिकारी (करवेळा) श्री. गोरक्षनाथ मंडलिक, देवगावचे सहाय्यक कृषी अधिकारी, शिवळेचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. स्वप्निल जाधव, नागावचे सहाय्यक कृषी अधिकारी विकास हेमाडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी अमित सोनवणे आदी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील या भीषण परिस्थितीवर आता शासनाकडून शेतकऱ्यांना तात्काळ काय मदत मिळते, याकडे संपूर्ण मुरबाड तालुक्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.
📲Get App