🔥 TRENDING शिक्षक ने खुद को मारी गोली, आत्महत्या... राजा ढाबा, चंडीगढ़‑लुधियाना मार्ग पर स... दादर स्थानक होणार आता ‘चैत्यभूमी’!७० व... Fire 🚒 hojivala industries कोटा, बारां, श्रीगंगानगर और करौली में... Goa Grants 24/7 Operation Permit to Sh...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

मुरबाड तालुक्यात बळीराजाच्या कष्टाचे सोने केले जातेय राखरांगोळी; अज्ञातांकडून भाताचे भारे पेटवून देण्याच्या घटनांनी खळबळ! विकृत मनोवृत्ती की जुन्या वादाचा बदला? दोषींवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 18 Nov 2026, 10:36 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र | किशोर पवार (मुरबाड तालुका प्रतिनिधी)काशिनाथ देसले जिल्हा प्रतिनिधी ठाणे
दिनांक १९/११/२०२६.
विशेष वार्ता पत्र
मुरबाड:
तालुक्यातील बळीराजाने वर्षभर ऊन-पावसाची तमा न बाळगता काबाडकष्ट करून पिकवलेले आणि कापणी करून घरासमोर आणून ठेवलेले भाताचे भारे अज्ञातांकडून पेटवून देण्याच्या संतापजनक घटना समोर येत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा हा प्रकार सुरू असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
वर्षाची मेहनत एका क्षणात राखरांगोळी
शेतकरी दिवसरात्र शेतात राबराब राबून भात पीक घेतो. पीक कापणीला आल्यानंतर आणि घरासमोर भाताचे भारे रचून ठेवल्यानंतर शेतकऱ्याचा आनंद अवर्णनीय असतो. मात्र, अलीकडे मुरबाड तालुक्यात हेच भाताचे भारे अज्ञातांकडून पेटवून दिले जात आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोने अशा प्रकारे जाळून टाकणे म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नाही, तर शेतकऱ्यांच्या जिव्हारी घाव घालण्याचा प्रकार आहे. या आगीत अनेक शेतकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून, वर्षभर खायचे काय, या विवंचनेत ही कुटुंबे हतबल झाली आहेत.
माणसातील विकृती की दुश्मनीचा बदला?
सध्या गावागावांत या घटनेचीच चर्चा सुरू असून, हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा निव्वळ विकृत मनोवृत्तीचा प्रकार आहे की शेजारी-पाजारी आणि भावकीतील जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी असे कृत्य केले जात आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. वैयक्तिक वादातून एखाद्याच्या पिकाचे नुकसान करणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी
शेती हाच शेतकऱ्यांच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. अशा परिस्थितीत पिकाला हात लावणे म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्यासारखे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहावे आणि सखोल तपास करून यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात कोणाचीही असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सुज्ञ नागरिकांनीही पुढे येण्याची गरज
केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता गावातील सुज्ञ नागरिक आणि ग्रामस्थांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी गावात गस्त घालून किंवा संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. मुरबाड तालुक्यात अशा दुर्दैवी घटना कायमच्या थांबाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
📲Get App