Religion
मुरबाड तालुक्यात भक्तीमय वातावरणात 'पायी दिंडी सोहळा २०२६' उत्साहात; शिवळे येथे माऊलींच्या रथाचे दर्शन व वारकऱ्यांचा सन्मान
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले. ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
दिनांक २६/११/२०२६
मुरबाड (प्रतिनिधी) | नीड २४ न्यूज महा:
अखिल मुरबाड तालुका पारमार्थिक शेतकरी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'पायी दिंडी सोहळा २०२६' मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात मार्गस्थ झाला आहे. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत विठ्ठलनामाचा अखंड गजर करत निघालेल्या या दिंडीतील माऊलींच्या पवित्र रथाने शिवळे येथील कार्यालयात विश्रांतीसाठी विसावा घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुभाष गोटीराम पवार यांनी माऊलींच्या रथाचे दर्शन घेत सेवा करण्याचे परमभाग्य लाभले.
या पायी दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शन ह.भ.प. दत्तात्रय महाराज सरजीने यांनी केले असून, दिंडी चालक म्हणून ह.भ.प. अर्जुन महाराज सरजीने यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच दिंडी
अध्यक्ष म्हणून श्री. गोटीराम घोरड यांनी सोहळ्याचे नेतृत्व केले. याप्रसंगी श्री. सुभाष गोटीराम पवार यांच्या हस्ते दिंडीच्या मार्गदर्शक व पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वारकऱ्यांच्या मुखातून निनादणारा विठ्ठलनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या मधुर निनादामुळे संपूर्ण शिवळे परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.
आदिवासी भगिनींचा साडी भेट देऊन सन्मान:
या आध्यात्मिक सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत, पालखीसोबत पायी प्रवास करणाऱ्या आदिवासी भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या माध्यमातून त्यांच्याप्रती आदर आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या सोहळ्याला श्री. रामभाऊ दळवी अण्णा, श्री. धनाजी दळवी, श्री. रमेश तुंगार, श्री. जयराम पगार यांच्यासह शिवळे येथील ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.