🔥 TRENDING Himachal Court Upholds Trans Giri's Sc... India Releases Delimitation Map: Uttar... तमिलनाडु और उत्तर प्रदेश रिंग टेनिस फा... करौली मे ं मंशा पूर्ण हनुमान मंदिर मे... एटा में शादी के टेंट पर करंट से 15 वर्... करौली में फिट इंडिया के तहत निकली साइक...
29 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

मुरबाड पोलिसांच्या वतीने ‘संडे ऑन सायकल’ उपक्रम उत्साहात संपन्न

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 29 Nov 2026, 04:24 PM 👁 21
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र:
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड, दि. २९ नोव्हेंबर २०२६
(विशेष प्रतिनिधी) –
नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘संडे ऑन सायकल’ (Sunday on Cycle) या विशेष उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपआयुक्त श्री. लाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
वाढते प्रदूषण रोखणे, दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व पटवून देणे आणि तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी जीवनशैलीकडे वळवणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. या सायकल रॅलीमध्ये मुरबाड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी, सायकलप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत नियमित सायकलिंग आणि व्यायामाचे फायदे समजावून सांगितले. तसेच, पोलीस आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सायकल रॅलीदरम्यान सहभागींनी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. मुरबाड पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
📲Get App