🔥 TRENDING મેઘવાળ પ્રિમિયલ લીગ 7નું સમાપન થયું विराट कोहली के प्रैक्टिस में न्यूज़ीलै... मुरबाडच्या ग्रामीण व आदिवासी खेड्यापाड... ખનિજ ચોરી કરતી આર્ચેન જખાઉ, આતો માટી ચ... પંચમહાલમાં 12 થી 18 નવેમ્બર દરમિયાન 'જ... *पांच लाख रुपये दो, वरना FIR पर FIR दर...
12 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

मुरबाड पोलिसांची अनोखी दीपावली; एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि विशेष मुलांसोबत साजरा केला आनंदोत्सव.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 12 Nov 2026, 07:37 PM 👁 7
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
विशेष वार्तापत्र, मुरबाड
दिनांक: १३/११/२०२६
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले (ठाणे)
सह तालुका रिपोर्टर: किशोर पवार (मुरबाड)
मुरबाड : कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य मुरबाड पोलिसांनी केले आहे. मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन हुंदळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिसांनी यंदाची दीपावली अत्यंत अनोख्या आणि संवेदनशील पद्धतीने साजरी केली. समाजातील वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी त्यांनी एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि विशेष मुलांसोबत दीपावलीचा आनंदोत्सव साजरा केला.
दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मुरबाड पोलिसांनी सरळगाव येथे एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची आपुलकीने भेट घेतली. पोलिसांनी या आजी-आजोबांची आस्थेने विचारपूस करून त्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांना दीपावलीनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. पोलीस हे केवळ गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नसून, समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी असतात, याची प्रचिती या उपक्रमातून आली. आपण एकटे नसून पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, ही भावना ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने 'तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी शाळेस' देखील भेट देण्यात आली. यावेळी मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन हुंदळेकर साहेब यांनी शाळेतील विशेष मुलांची अत्यंत आपुलकीने भेट घेतली. अधिकाऱ्यांनी या मुलांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांना दीपावलीचा गोड फराळ भेट म्हणून दिला.
पोलिसांच्या या माणुसकीच्या आणि संवेदनशील उपक्रमाचे संपूर्ण मुरबाड तालुक्यातून आणि नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
📲Get App