🔥 TRENDING અરવલ્લી તાલુકાના ધનસુડા ચોકડીમાં ગાયોન... फार्म भरने के नाम पर से गायब हुई लड़कि... APPSC 2026 Group‑1 Notification Releas... Former Andhra Pradesh Deputy CM Sriniv... Former AP Deputy CM Alla Nani dies of... US Senate Passes Landmark CLARITY Act...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

मुरबाड बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या बांगड्या चोरणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद!

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 15 Sep 2026, 09:44 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या बांगड्या चोरणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद!:मुरबाड बसस्थानकात एसटी बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या अत्यंत हुशारीने आणि कटरच्या साहाय्याने चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना मुरबाड पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुरबाड बसस्थानक आणि परिसरात प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विशेषतः एसटी बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कटरने कापून चोरणारी एक टोळी सक्रिय झाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुरबाड पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचला होता. अखेर पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गर्दीत चोऱ्या केल्याची कबुली दिली.सणासुदीच्या काळात काळजी घ्या: पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे आवाहनया यशस्वी कारवाईनंतर मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "सध्या गणेशोत्सव आणि इतर सणासुदीचे दिवस सुरू असल्याने बाजारपेठा आणि बसस्थानकांवर मोठी गर्दी होत आहे. अशा काळात महिलांनी आपले दागिने, पर्स आणि इतर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा," असे त्यांनी सांगितले.या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.जिल्हा सिटी रिपोर्टर: काशिनाथ देसलेतालुका सिटीझन रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाडदिनांक: १५/०९/२०२६
📲Get App