🔥 TRENDING Tripura SEC to Announce ULB Poll Sched... पीएम किसान योजना की 24वीं किस्त जारी:... વેજલપુર (અમદાવાદ)ના જલીયાણા સત્સંગ મંડ... MPUAT to Mark 27th Foundation Day on N... अलीगढ़ जेएनएमसी में भर्ती मरीज मुजीउर्... Bhopal Power Cut on Oct 30: 2‑6‑Hour O...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

मुरबाड आणि कल्याणमध्ये काळी-पिवळी टॅक्सींसाठी अधिकृत स्टँड द्या; आमदार किसन कथोरे यांची आरटीओकडे जोरदार मागणी

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 30 Oct 2026, 11:00 AM 👁 32
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
दिनांक: ३०/१०/२०२६

मुरबाड आणि कल्याणमध्ये काळी-पिवळी टॅक्सींसाठी अधिकृत स्टँड द्या; आमदार किसन कथोरे यांची आरटीओकडे जोरदार मागणी

मुरबाड:
मुरबाड आणि कल्याण तालुक्यात काळी-पिवळी टॅक्सीद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना अधिकृत थांबे उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीचे नियोजन सुलभ करण्यासाठी तातडीने अधिकृत स्टँड निश्चित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), कल्याण यांना अधिकृत पत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
आमदार कथोरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, मुरबाड व कल्याण तालुक्यातील काळी-पिवळी एर्टिगा मीटर टॅक्सींसाठी 'एमएमआरडीए' (MMRDA) अंतर्गत प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यात आले आहेत. मात्र, या टॅक्सींना नियमित प्रवासी सेवेसाठी अधिकृत स्टँड उपलब्ध नसल्यामुळे चालक तसेच प्रवाशांना रोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर बाब त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आमदार कथोरे यांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी अधिकृत स्टँड निश्चित करण्याची मागणी केली आहे:
१. जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले मुरबाड:
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
मुरबाड एसटी स्थानकाजवळील मेन रोडलगत, ब्रीजजवळ.
२. कल्याण: कल्याण-मुरबाड रोडवरील रेल्वे स्थानक परिसर.
या दोन्ही ठिकाणी अधिकृत स्टँड निश्चित झाल्यास प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सी सहज उपलब्ध होतील. तसेच टॅक्सी चालकांनाही हक्काची जागा मिळून वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार किसन कथोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या जागांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता प्रादेशिक परिवहन विभाग या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी कधी करणार आणि अधिकृत स्टँडबाबत अंतिम निर्णय केव्हा घेणार, याकडे टॅक्सी चालकांसह सर्वसामान्य प्रवाशांचे डोळे लागले आहेत.
📲Get App