🔥 ट्रेंडिंग विजाग शॉपिंग एक्सपो में रेडिसन ब्लू पर... ओपन मैगज़ीन ने राजनीति और विज्ञापन के... भगवंत मान ने फसल कर्ज पर एक‑बार का राह... भारत के आर्थिक आँकड़ों ने विश्वास में... भारत बनाम अफगानिस्तान टी20आई सीरीज: ला... भारत के ऑल‑राउंडर ने एशिया कप में शानद...
08 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मुलींच्या खांद्यावर वडिलांची अखेरची यात्रा अंतयात्रेत पार पाडली मुलाची भूमिका

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 07 सित. 2026, 02:16 PM 👁 74
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दिपाली आणि प्रगती दिला वडिलांना अखेरचा खांदा

मुलगा नसल्याची खंत नाही; मुलींनीच दिला वडिलांना अखेरचा खांदा
दिपाली व प्रगती चौधरी यांनी वडील कै. देविदास सुखदेव चौधरी यांच्या अंत्ययात्रेत पार पाडली मुलाची भूमिका; चौधरी समाजासाठी ठरला आदर्श

यशवंत नगर, भडगाव येथील रहिवासी प्रकाश सुखदेव चौधरी यांचे लहान बंधू कै. देविदास सुखदेव चौधरी यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दिपाली व प्रगती या दोन मुली आहेत. मुलगा नसला तरी मुली कोणत्याही बाबतीत कमी नसतात, हा सामाजिक संदेश देत त्यांच्या दोन्ही मुलींनी वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
वडिलांच्या निधनानंतर अनेक कुटुंबांमध्ये मुलगा नसल्याची उणीव जाणवते. मात्र, ‘मुलगाच हवा’ या पारंपरिक विचारांना छेद देत दिपाली आणि प्रगती देविदास चौधरी यांनी वडिलांच्या अंत्ययात्रेत पुढाकार घेतला. वडिलांना अखेरचा खांदा देण्यापासून ते अंत्यसंस्काराच्या विधीपर्यंत त्यांनी मुलाची जबाबदारी पार पाडली.
या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणतानाच समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करण्याची गरज नाही; मुलगीही आई-वडिलांची शेवटपर्यंत साथ देऊ शकते आणि मुलाची प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकते, हे दिपाली व प्रगती यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
या अंत्ययात्रेची परिसरात विशेष चर्चा झाली असून, चौधरी समाजासह इतर समाजांसाठीही ही अंत्ययात्रा एक आदर्श आणि प्रेरणादायी ठरली आहे. मुलींना समान संधी, समान अधिकार आणि समान जबाबदारी दिल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे पुढे येऊ शकतात, याचे हे जिवंत उदाहरण ठरले.
‘मुलगा नसल्याची खंत नको, मुलींचा अभिमान बाळगा’ असा भावनिक आणि सामाजिक संदेश देणारा हा प्रसंग भडगावकरांच्या स्मरणात राहणारा ठरला.
📲Get App