🔥 ट्रेंडिंग भांकरोटा में बस-ट्रक की दुर्घटना में त... देवरिया के रायबारी गांव में खेत में नि... सरगुजा में बस किराया बढ़ने से ग्रामीण... ધનતેરસ પહેલાં સોનું‑ચાંદીના ભાવમાં ઘટવ... விழுப்புரத்தில் 'விளைநிலம் காப்போம்' வ... निवाई बाईपास पर गहरे गड्ढे से आमजन को...
24 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी काँग्रेसच्या जन आक्रोश मोर्चा

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 24 अक्टू. 2026, 09:25 AM 👁 79
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी काँग्रेसच्या जन आक्रोश मोर्चा

कथित ओट चोरीच्या विरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शहरातील महात्मा फुले स्मारकापासून सुरू झालेला या मोर्चात काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी माजी मंत्री खासदार आणि तळागाळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हातामध्ये पक्षाचे तिरंगी झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सकाळी महात्मा फुले स्मारकात अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली मुख्य मार्गाने जात हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला मोर्चात सहभागी जनसमुदायाने संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून टाकला होता प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर मागण्याचे सविस्तर निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला सादर करण्यात आले मोर्चा दरम्यान काँग्रेस नेत्यांनी सांगितले की सध्या देशात आणि राज्यात लोकशाहीच्या गळा आवळळा जात आहे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता संपुष्टात आली असून ओट चोरीचे प्रकार समोर येत आहे या मोर्चा त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील माजी मंत्री पद्माकर वळवी एडवोकेट के सी पाडवी खासदार एडवोकेट गोवाल पाडवी युवक काँग्रेसचे निलेश पाटील दिलीप नाईक सुहास नाईक अन्सारी यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि हजारो नागरिक उस्फुर्तपणे सहभागी झाले होते
📲Get App