🔥 TRENDING Instagram Acquaintance Flees Pune Temp... UP Tourist Killed in Watersports Accid... 21‑Year‑Old Bharati Sony Arrested in J... DMK Reverses Stance, Moves from Burnin... FDA Seizes Five Slaughter Units, Dispo... Goa Launches Majhe App to Consolidate...
29 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मढे घाट मार्गाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करा; खासदार डॉ. निलेश लंके यांच्याकडे वेल्हेकरांची मागणी

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 29 Nov 2026, 09:41 AM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
वेल्हा, पुणे : मढे घाट मार्गे पुणे ते महाड आणि पुढे गोव्याला जोडणारा पर्यायी महामार्ग विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाबाबत खासदार डॉ. निलेश लंके यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. हा महत्त्वपूर्ण प्रश्न लोकसभेत उपस्थित करून मार्गाच्या विकासासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती राजगड-वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या वतीने नंदकुमार गालींदे यांनी खासदार लंके यांच्याकडे केली.

या प्रस्तावित मार्गामध्ये मढे घाट, रांजणी, खामगाव, कोंडगाव, पाबे खिंड, वेल्हे, भट्टी खिंड, पासली, केळद आणि उफंड्या कर्णवड परिसरातून पुढे महाड औद्योगिक वसाहतीकडे जोडणी करून गोवा महामार्गाला जोडण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

मढे घाट मार्गाचा विकास झाल्यास वेल्हे तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. पुण्याहून महाड आणि पुढे गोव्याकडे जाण्यासाठी हा मार्ग पर्यायी व कमी अंतराचा ठरू शकतो. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक बाजारपेठ, व्यापार, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

राजगड-वेल्हे तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असूनही अपेक्षित विकासापासून दूर आहे. मढे घाट मार्ग विकसित झाल्यास या भागाला दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होईल आणि परिसराच्या आर्थिक विकासाचे नवे दालन खुले होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
📲Get App