🔥 TRENDING मेडिकल कॉलेज करोली ने 2026 का नया प्रो... HP Police Announces Recruitment for 20... Upper Caste Activists Protest in Himac... Minister Dhami intervenes as Daler Meh... Uttarakhand CM Dhami Comments on Daler... Uttarakhand Gears Up for Voter Registr...
23 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला बळ, जनतेचा प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 22 Oct 2026, 11:52 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला बळ, जनतेचा प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार!
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २३/१०/२०२६.
मुंबई, ठाणे.
विशेष वृत्त :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील वर्षा निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्याविहार पूर्व-पश्चिम यांना जोडणारा रेल्वेपूल (विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेपूल), शीव रेल्वेस्थानक येथील उड्डाणपूल तसेच गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहोचण्यासाठी '59 मिनिटांत मुंबई' या संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान संपर्क जोडणीसह नागरिकांच्या 'इज ऑफ लिव्हिंग' मध्ये कमालीची सुधारणा होणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम भागात अखंड संपर्कव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. विद्याविहार, गोरेगाव पूर्व आणि शीव येथील तिन्ही पूल प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असून, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल. पूर्व-पश्चिम संपर्कासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. विद्याविहार रेल्वेस्थानकावरील पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या भागातील प्रवासासाठी यापूर्वी सुमारे 30 मिनिटे लागत होती. आता हे अंतर 10 मिनिटांत पार करता येईल. त्यामुळे घाटकोपर स्थानकावरील उड्डाणपुलाचा वाहतूक भारही कमी होण्यास मदत होईल.

गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन परिसरातील उड्डाणपूल आणि उन्नत गोलाकार रस्ता प्रकल्पाची रचना प्रभावी पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी हॉटेल जंक्शन तसेच लगतच्या चौकांतील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल. पूर्व-पश्चिम संपर्कक्षमता वाढविण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. शीव रेल्वे स्थानकावरील जुना पूल 112 वर्षे जुना आणि असुरक्षित झाला होता. नवीन पूल वाहतुकीसाठी उपयुक्त ठरण्याबरोबरच पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम हाती घेणे शक्य होणार आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलची संख्या आणि वारंवारता वाढविता येईल व त्याचा प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने विकसित

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन शीव पूल पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला धारावी, वांद्रे व बीकेसी या पश्चिमेकडील भागांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास अधिक सुलभ होईल. मुंबई महानगरपालिका काँक्रीट रस्ते, कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने विकसित करीत आहे.

शीव रेल्वे पूल

हा 112 वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्यामुळे आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठी त्याची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल. शीव पूर्व आणि शीव पश्चिम भागांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, धारावी आणि वांद्रे यांच्याशी (दरम्यान) सुलभ जोडणी उपलब्ध करून देतो. या प्रकल्पाचा खर्च रेल्वे भागासाठी ₹33.51 कोटी आणि पोहोच रस्त्यासाठी ₹31.62 कोटी आहे. पुलाचे काम अंदाजे 4 महिने अगोदर पूर्ण करण्यात आले आहे.

रेल्वे पुलाची एकूण लांबी 54.5 मीटर व रुंदी 26 मीटर आहे. या पुलासाठी 496 टन वजनाचे 2 'सेमी थ्रू स्टील गर्डर' वापरण्यात आले आहेत. पोहोच रस्त्याची लांबी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या दिशेने 65 मीटर, धारावीच्या दिशेने 110 मीटर आणि एल.बी.एस. मार्गाच्या दिशेने 97 मीटर आहे. एल.बी.एस. मार्ग व संत रोहिदास मार्गावर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. सॉलिड अप्रोच व जमिनीला मजबुती देण्यासाठी 'टच पाईल्स'चा वापर करण्यात आला आहे.

विद्याविहार उड्डाणपूल (पूर्व व पश्चिम जोडणारा)

विद्याविहार पूर्व आणि पश्चिम परिसराला थेट जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात आले. घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. पुलाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आले आहे. टप्पा- 1 मध्ये रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्थापना व 99.34 मीटर लांबीच्या 2 तुळ्यांची स्थापना करण्यात आली. तसेच टप्पा- 2 मध्ये पूर्व व पश्चिम बाजूंच्या 500 मीटर लांबीच्या सेवा रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. पुलाची एकूण लांबी 600 मीटर असून, रुंदी 15.50 मीटर ते 17.50 मीटर आहे. पूर्वेकडील आर.सी. मार्ग आणि पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्ग यांमधील प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांवरून अंदाजे 10 मिनिटांवर येणार आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपूल

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये जलद व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. तसेच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत सहज व जलद पोहोचता येईल. ए.के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड आणि हॉटेल रत्नागिरी जंक्शन परिसरातील प्रमुख वाहतूक कोंडी कमी होण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल.

गोरेगाव पूर्व येथील हा 1.26 किलोमीटर लांबीचा, 6 मार्गिकांचा उड्डाणपूल आहे. यामध्ये पूर्वनिर्मित बॉक्स आकाराच्या काँक्रीट सेगमेंटचा वापर करण्यात आला आहे. उड्डाणपुलावर पी-7 ते पी-11 दरम्यान वक्राकार पोलादी स्पॅन आणि गुंतागुंतीची बहुदिशात्मक रचना आहे. भूस्तराच्या स्थितीनुसार पाइल्स आणि ओपन फाउंडेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📲Get App