Local
मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला दिया मिर्झा अभिनीत पर्यावरणीय दिवाळी जनजागृती व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचा आदेश
राजकीय दबावाखाली काढून टाकलेला दिया मिर्झा अभिनीत पर्यावरणपूरक दिवाळी जनजागृती व्हिडिओ पुन्हा प्रकाशित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले.
न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि डॉ. नीला के. गोखले यांच्या खंडपीठाने "तीव्र दुःख आणि नाराजी" व्यक्त केली आणि राजकीय प्रतिक्रियेमुळे आपण "व्यथित" झालो असल्याचे म्हटले.
मुंबईतील वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार BMC ने पर्यावरणपूरक व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी एक जनजागृती मोहीम सुरू केली होती. या मोहिमेसाठी BMC ने दिया मिर्झा, माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह काही सेलिब्रिटींना मानधनाशिवाय (Free of charge) सहभागी करून घेतले होते. दिया मिर्झा यांनी सार्वजनिक रस्त्यांवर फटाके न फोडण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओ BMC च्या विनंतीवरून तयार केला होता.
हा व्हिडीओ BMC च्या सोशल मीडिया खात्यांवर पोस्ट केल्यानंतर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. अमित साटम यांनी म्हटले की, "आम्हाला दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही". तर महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झा यांना 'हिंदूविरोधी' आणि विशिष्ट अजेंडा राबवणाऱ्या ठरवून त्यांना १००% ब्लॅकलिस्ट केल्याचे जाहीर केले. या राजकीय दबावानंतर BMC ने तात्काळ दिया मिर्झा यांचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया पेजवरून हटवला.