🔥 TRENDING चिचपल्ली बसस्थानकावर स्वच्छतागृहाचा अभ... All India Oriental Conference Opens To... घर के अंदर जमीन खोदी तो निकलने लगे नोट... Uttarakhand to Launch First Religious... Delhi Court Reserves Order on Framing... P&H High Court Issues Formula to Compu...
29 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई; ४८ हजार ४०० रुपयांचा दंड!

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 29 Oct 2026, 04:44 PM 👁 5
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट, काळ्या फिल्मच्या काचा,आसनर् चारचाकी या वाहनांनवर वाहतूक शाखेचा दणका!

🚨 लोणावळ्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई; ४८ हजार ४०० रुपयांचा दंड!

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट, काळ्या फिल्मच्या काचा, आसनर्या चारचाकी, या वाहनांन वर वाहतूक शाखेचा दणका.

लोणावळा | प्रतिनिधी!

लोणावळा परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई करत, एकूण ४८ हजार, ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

या कारवाईत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटार सायकली, वाहनांच्या काचांना अनधिकृत काळी फिल्म लावणे, अशा नियमभंगाच्या प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे, रस्त्यांवरील शिस्त कायम राहावी, ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा आणि वाहनचालकांसह नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई!

ही कारवाई लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक भूषण माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया मुळे, पोलीस हवालदार भूषण कदम, विनोद गवरी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंदे, यश देसाई, पोलीस मित्र अनिल लोंढे, विनोद विकारी, विक्रम येवले व वाजे यांनी केली.

वाहनचालकांना वाहतूक शाखेचे आवाहन;

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेने सर्व वाहनचालकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करावा. वाहनांच्या काचांना अनधिकृत काळी फिल्म लावू नये, तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर टाळावा.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे पालन करा, स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्या!
📲Get App