🔥 TRENDING જૂનાગઢ મુક્તિદિન: ૯ નવેમ્બર એ નવાબી શા... Delhi Air Quality Exceeds WHO Limits 6... निवाली में फटाका मार्किट में आग लग गई Karnataka Urges Polluter-Pays System t... સુરત ક્ષત્રિય ઠાકોર સમાજે દિવાળી અને ન... RRB Opens 191 Isolated Category Jobs,...
09 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होणार..; ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन आकर्षण..!! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 09 Nov 2026, 09:52 AM 👁 57
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
लोणी : आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील पैसा-गलठा परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर वर्धापन दिनानिमित्त सकाळी ८ ते ९ या वेळेत मूर्ती अभिषेक व पूजनाचा कार्यक्रम सौ. स्मिता व श्री. ज्ञानेश्वर दामोदर वाळुंज यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत समाजप्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार असून त्यांच्या कीर्तनातून भाविकांना अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनाचा लाभ मिळणार आहे. कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दुपारी २ ते ४ या वेळेत सर्व माहेरवाशिणी व स्थानिक महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ६ ते ७ या वेळेत श्री विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ, पैसा-गलठा वस्ती यांच्या वतीने सुमधुर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्याच्या आयोजनासाठी समस्त लेझीम मंडळ, पैसा-गलठा, लोणी, मुंबईकर, पुणेकर मंडळ तसेच नवतरुण मित्र मंडळ यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. तरी परिसरातील सर्व भाविकांनी, महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App