🔥 TRENDING Tipsy Man’s Neat Laundry Folding in Ba... जूली ने खड ़ े होकर बांट दिए 'लड्डू':... शाहजहाँपुर के सुनौरा अजमतपुर में श्री... Himachal CM directs commission to draf... Power Outages Hit Hundreds of Thousand... Rahul Gandhi Appears in Black T‑Shirt,...
29 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणी, राणमळा व पोंदेवाडीतील १३३ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप...!! लुपिन फाउंडेशन व व्हर्लपूलच्या संयुक्त उपक्रमातून जलसंधारणासह शेतीला नवी दिशा..!! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News,

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 29 Nov 2026, 09:06 AM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
लोणी (ता. आंबेगाव) : पाणी बचत आणि शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे आणि इलिका पी. बी. व्हर्लपूल किचन अप्लायन्सेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘उपजीविका विकासासाठी जलसंसाधन प्रकल्प’ अंतर्गत लोणी, राणमळा व पोंदेवाडी येथील एकूण १३३ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रासाठी सिंचन संच देण्यात आला.

सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत तुषार सिंचन पद्धतीमुळे कमी पाण्यात पिकांना आवश्यक सिंचन करता येणार असून, पाण्याची बचत करून शेती उत्पादन वाढविण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

दीड वर्षात जलसंधारणाची विविध कामे

लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात परिसरात जलसंधारणाच्या विविध कामांना चालना देण्यात आली. यामध्ये आठ सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी, तीन पाझर तलावांमधील गाळ काढणे, जिल्हा परिषद शाळा लोणी तसेच उपबाजार समिती मंचरच्या लोणी बाजार आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात आली. या जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यास आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत झाली आहे.

शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

तुषार सिंचन संच वितरण कार्यक्रमास प्रदीप वळसे पाटील (संचालक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव), राणमळा गावचे सरपंच राजेंद्र सिनलकर, उपसरपंच संतोष सिनलकर, पोलीस पाटील रुपेश सिनलकर, संतोष सिनलकर, पोंदेवाडीचे माजी सरपंच, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी लुपिन फाउंडेशनचे प्रताप मोटे यांनी तुषार सिंचन संचांच्या माध्यमातून भाजीपाला पिकांना पाणी देऊन कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. फिनोलेक्सचे रोहित कदम व संभाजी कठाळे यांनी सिंचन संचांची जोडणी, पाणी नियोजन आणि संचांचा योग्य वापर याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.

लुपिन फाउंडेशनचे वर्कसाईड हेड व्यंकटेश शेटे व संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोऱ्हाडे व मच्छिंद्र खरात यांचीही यावेळी उपस्थिती होती.

जलसंधारण, पाणी बचत आणि आधुनिक सिंचन तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा हा उपक्रम परिसरातील शेतीला शाश्वत विकासाची दिशा देणारा ठरत आहे.
📲Get App