🔥 ट्रेंडिंग મેઘરજમાં અપોલો પાસે દારૂ ભરેલી કાર જપ્... મેઘરજમાં અપોલો પાસે દારૂ ભરેલી કાર જપ્... ઉજજૈનના પરિવારનું દુર્ભાગ્ય: ચોટીલા નજ... અમદાવાદ કસ્ટમ્સે બેંગકોકથી આવેલા મુસાફ... गणेश उत्सवानिमित्त मोफत दंत रोग व नेत्... પોરબંદર જિલ્લા ભાજપમાં વરસાદની પરિસ્થિ...
21 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
.लाखोंच्या डागडुजीनंतर अवघ्या दोन महिन्यांत नढई-नारिवली रस्त्याची चाळण.
स्थानीय

.लाखोंच्या डागडुजीनंतर अवघ्या दोन महिन्यांत नढई-नारिवली रस्त्याची चाळण.

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 11 सित. 2026, 11:42 AM 👁 76
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
२४ न्यूज (24 News) साठी विशेष बातमी पत्र .लाखोंच्या डागडुजीनंतर अवघ्या दोन महिन्यांत नढई-नारिवली रस्त्याची चाळण; गणेशोत्सवापूर्वी तात्काळ दुरुस्तीची नागरिकांची मागणी!मुरबाड:केवळ दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आलेल्या नढई-म्हाडस-नारिवली रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.स्टोन क्रेशरच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे रस्त्याची वाटबांधिवली येथे नव्याने सुरू झालेल्या स्टोन क्रेशरमधून खडीची वाहतूक करणारे शेकडो ओव्हरलोड डंपर दररोज या रस्त्यावरून धावत आहेत. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या अवजड वाहतुकीमुळेच रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभाग (RTO) आणि प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे क्रेशर चालकांचे धाडस अधिकच वाढले आहे.गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांचे हालगौरी-गणपतीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. मात्र, रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे यंदा गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यांतूनच करावे लागणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आमदार किसन कथोरे यांनी या रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यास अद्याप वेळ आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सणापूर्वी या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी आणि महसूल विभागाने संबंधित बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या स्टोन क्रेशरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.सिटीझन रिपोर्टर: काशिनाथ देसलेतालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाडदिनांक: ११ सप्टेंबर २०२६.
📲Get App