🔥 TRENDING Mamta Kulkarni to Receive Lifetime Ach... Tamil Nadu government expands free bus... Annamalai Rejects Periyar’s Anti‑Brahm... Starbucks to Establish Global Capabili... Botswana Cheetah Released into Gandhi... Congress leader Mallikarjun Kharge rid...
22 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
लांजा शहरात ‘अनबॉक्स’ घरपोच खाद्यसेवा औपचारिकपणे सुरू
Local

लांजा शहरात ‘अनबॉक्स’ घरपोच खाद्यसेवा औपचारिकपणे सुरू

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 08 Sep 2026, 07:00 PM 👁 37
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राहुल शिंदे, प्रवीण शेट्ये आणि मंदार भिंगार्डे यांच्या उपक्रमातून लांजा मध्ये ‘अनबॉक्स’ घरपोच सेवा सुरू; स्थानिक हॉटेल व उपाहारगृहांना डिजिटल प्लॅटफॉर्म मिळणार.

लांजा शहरात ‘अनबॉक्स’ नावाची नवीन घरपोच खाद्यसेवा उद्यापासून सुरू होत आहे. हा उपक्रम राहुल शिंदे, प्रवीण शेट्ये आणि मंदार भिंगार्डे यांच्या पुढाकाराने राबविला गेला असून, नागरिकांना दर्जेदार व स्वादिष्ट खाद्यपदार्थ तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू घरबसल्या सहज उपलब्ध होणार आहेत.

सेवेच्या माध्यमातून ग्राहक विविध हॉटेल व उपाहारगृहांतील आवडते पदार्थ ऑर्डर करून थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवू शकतील. ऑर्डर केल्यानंतर अन्नाची सुरक्षित व वेळेवर वितरणाची व्यवस्था या प्लॅटफॉर्मद्वारे केली जाईल.

‘अनबॉक्स’ च्या प्रवेशामुळे स्थानिक हॉटेल व उपाहारगृहांच्या व्यवसायाला डिजिटल स्वरूप मिळेल, ज्यामुळे त्यांची पोहोच विस्तृत ग्राहकवर्गापर्यंत वाढेल. ग्राहकांना एकाच छताखाली विविध पर्यायांची निवड करणे सोपे होईल, तर व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांची व्यापकता वाढवता येईल.

सेवेचा औपचारिक शुभारंभ ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शेट्येवाडी येथील विकास शेट्ये यांच्या कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमात आमदार किरण (भैय्या) सामंत प्रमुख उपस्थित राहतील आणि कु. अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, सुधाकर शेट्ये, कमलाकर गांधी, विजय कुरूप, सुनील (राजू) कुरूप, प्रकाश लांजेकर, नगराध्यक्षा सावली कुरूप व उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर यांसारखे मान्यवरही उपस्थित राहतील.

लांजा शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा व बदलत्या जीवनशैलीचा विचार करता ही घरपोच सेवा एक नवी व सोयीस्कर सुविधा ठरली आहे. ‘अनबॉक्स’ द्वारे लांजातील खाद्यव्यवसायाला डिजिटल प्लॅटफॉर्म मिळेल, तर ग्राहकांना घरबसल्या आवडते अन्न व आवश्यक वस्तू मिळण्याची सोय उपलब्ध होईल.
📲Get App