🔥 TRENDING गिड़ा पंचायत समिति में पंचायत सचिवों क... ગુજરાતમાં આગામી 7 દિવસ સામાન્યથી મધ્યમ... સુરત: અમરોલીમાં મહાનગરપાલિકાની ટીમ પર... સુરતમાં ચમત્કારિક બચાવ: કાર નીચે આવી જ... श्री माहौर वैश्य पंचायत द्वारा श्री अन... રાપર પંથકમાં LCBનો દારૂ પર સપાટો
23 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

खेडशीजवळ ट्रॅव्हल्सची वासराला धडक; नागरिक, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वाचले वासरू

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 23 Sep 2026, 04:10 PM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मिऱ्या-नागपूर महामार्गावर खेडशीजवळ एका ट्रॅव्हल्सने मोकाट वासराला धडक दिल्यानंतर जखमी वासराला नागरिक, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने जीवदान मिळाले.

मिऱ्या–नागपूर महामार्गावर खेडशी येथील आकाशवाणी केंद्राजवळ मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास एका ट्रॅव्हल्सने मोकाट वासराला जोरदार धडक दिली. या धडकेत वासरू रस्त्यावर कोसळल्याने काही काळ घटनास्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीचे कर्मचारीही मदतीला पोहोचले. जखमी वासराच्या उपचारांसाठी नागरिकांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दरम्यान, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पालवे यांना माहिती मिळताच त्यांनी हातखंबा बीट अंमलदार भिसे आणि खेडशी बीट अंमलदार कदम यांना घटनास्थळी पाठवले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनु घोगरे यांनी माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी वासराची तपासणी करून आवश्यक इंजेक्शन व उपचार केले, ज्यामुळे वासराला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली. या घटनेत स्थानिक नागरिक, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता वाखाणण्याजोगी आहे.

अपघाताच्या गोंधळात अनेकदा मुक्या जीवांकडे दुर्लक्ष होते, मात्र या घटनेत माणुसकीचा प्रत्यय आला. शब्दांत वेदना व्यक्त करता येत नसलेल्या वासराच्या वेदना ओळखून मदतीला धावून जाण्याची कृती खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवते. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे वासराचा जीव वाचला, यातच सर्वांनी समाधान मानले.
📲Get App