🔥 ट्रेंडिंग বাগনানের খালোড় কালীবাড়িতে সকল রাজ্যে... पंचायतीराज चुनाव सीधी-रीवा सुगम परिवहन सेवा शुरू, यात्र... ಯಲಹಂಕ: ಮತ್ತಳ್ಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ... सुप्रीम कोर्ट में कान्हा @ कान्हैया सि... अमृतसर में नाकाबंदी के दौरान युवक को द...
30 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सक्षम करा; एसपी कार्यालयात विशेष कार्यशाळा संपन्न...

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 30 सित. 2026, 09:18 PM 👁 15
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जातीय तणावासह विविध सामाजिक आणि स्थानिक घडामोडींचा वेळीच अंदाज घेऊन वरिष्ठांना अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले होते.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील गोपनीय शाखेचे अंमलदार, जिल्हा विशेष शाखा (DSB), एटीबी आणि एटीसी पथकाशी संबंधित अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित अंमलदारांना सखोल मार्गदर्शन केले.

संवेदनशील गावांचा आढावा

कार्यशाळेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील गावे, जातीय तणावाची शक्यता असलेली ठिकाणे आणि स्थानिक पातळीवरील राजकीय-सामाजिक समीकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या घडामोडींचा वेध घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

गोपनीय माहिती अर्थात इंटेलिजन्स कशी मिळवावी, मिळालेल्या माहितीची सत्यता कशी पडताळावी आणि ती माहिती विहित मार्गाने व वेळेत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कशी पोहोचवावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील व्यक्ती, समूह आणि त्यांच्यातील बदलते संबंध यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

पोलीस ठाणेनिहाय चर्चा करत प्रत्येक भागाच्या परिस्थितीनुसार कोणत्या बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, याची माहिती अंमलदारांकडून घेण्यात आली.

या कार्यशाळेमुळे गोपनीय विभागात काम करणारे अंमलदार अधिक सतर्क आणि जबाबदारीबाबत अधिक संवेदनशील झाले असून, जिल्ह्यातील इंटेलिजन्स यंत्रणा अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
📲Get App