🔥 ट्रेंडिंग करौली मे ं महिला से रेप और मारपीट, 1 आ... भाल्कि ग्रामीण पुलिस ने रात्रि समय में... ਪੰਜਾਬ: ਸ਼ਰਾਬ ਦੀਆਂ ਪੇਟੀਆਂ ਨਾਲ ਭਰੀ ਫੋਰਚੂ... चुनावी तैयारियों का जायजा लेने पहुंच े... अमोल की पहाड़ियो ं में पेड ़ से लटके म... करौली पुलिस ने मतदान से पहले फ्लैग मार...
16 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

कुयफाटा येथे अंजनी ट्रॅव्हल्सला भीषण आग, प्रवासी सुखरूप, सामान जळून खाक

✍️ रिपोर्टर: DOCTOR PINTU PAUL 🗓 16 नव. 2026, 08:19 PM 👁 22
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कुयफाटा येथे अंजनी ट्रॅव्हल्सला भीषण आग, प्रवासी सुखरूप, सामान जळून खाक

| कुयफाटा येथे अंजनी ट्रॅव्हल्सला भीषण आग, प्रवासी सुखरूप, सामान जळून खाक

कुयफाटा : नागपूरहून घोटकडे नेहमीप्रमाणे येणाऱ्या अंजनी ट्रॅव्हल्सच्या वाहनाला कुयफाटा येथे भीषण आग लागल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनी ट्रॅव्हल्सची सायंकाळची 4:30 PM ची गाडी (गाडी नं. MH 12 KQ 1610) नागपूरवरून घोटकडे येत असताना कुयफाटा येथे अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आगीने काही क्षणातच संपूर्ण वाहनाला वेढा घातला.

सुदैवाने यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र प्रवाशांचे सामान आगीत जळून खाक झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग विझवली. तोपर्यंत वाहन पूर्णपणे जळून गेले होते.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

-
📲Get App