🔥 TRENDING Delhi Suffers Under Heavy Air Pollutio... Madhya Pradesh High Court reserves ver... BJP nominates Hardeep Singh Puri as Ra... মানবাজারে একাধিক খাবারের দোকানে সারপ্র... बदायूं के सहसवान नगर में मोहिउद्दीनपुर... ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪೂರ್ವಭಾವಿ ತರಬೇತಿ ಶಿಬಿರಕ್ಕ...
28 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

कर्तव्यावर निघालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा प्रवासातच मृत्यू; पोलीस दलावर शोककळा! काही निरोप हे कायमचे ठरतात, याची कल्पनाही नसते...

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 28 Oct 2026, 07:45 PM 👁 103
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
💔 "पोलीस स्टेशन आलं की मला उठव..." म्हणणारे साहेब पुन्हा कधीच उठले नाहीत! 🥹🙏

कर्तव्यावर निघालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा प्रवासातच मृत्यू; पोलीस दलावर शोककळा!
काही निरोप हे कायमचे ठरतात, याची कल्पनाही नसते...

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक :२८/१०/२०२६.
मुंबई विशेष वृत्त
मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड हे नेहमीप्रमाणे नवी मुंबईतील उलवे येथील आपल्या घरातून कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
प्रवासादरम्यान वडाळा परिसरात आल्यानंतर त्यांनी एका फोनवर संवाद साधला. कामाचा व्याप आणि धावपळीमुळे थकवा जाणवत असल्याने त्यांनी आपल्या चालकाला, "मी थोडा वेळ झोपतो, पोलीस स्टेशन आलं की मला उठव..." असे सांगितले आणि डोळे मिटले.
गाडी पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचली. चालकाने साहेबांना उठवण्यासाठी आवाज दिला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कर्तव्य बजावण्यासाठी घरातून निघालेल्या या अधिकाऱ्याचा प्रवासातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली.आहे
ज्या पोलीस ठाण्यात ते कर्तव्य बजावण्यासाठी निघाले होते, त्याच ठिकाणी पोहोचल्यानंतरही त्यांना पुन्हा उठता आले नाही,. ही बाब मन हेलावून टाकणारी आहे..
कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष काळाच्या पडद्याआड गेला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड यांना नीड २४न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
📲Get App