🔥 TRENDING Rocky Fans Set World Record in Philade... RSS Chief Mohan Bhagwat to Visit Manip... Manipur PSC Releases Assistant Enginee... Manipur Celebrates Ningol Chakouba Fes... Assam Cricket Team Kicks Off Syed Mush... Heavy Rain, Thunderstorms Expected Acr...
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

कार्तिकी यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात गॅस सिलिंडर, केरोसीन तसेच स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 15 Nov 2026, 08:21 AM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कार्तिकी यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात गॅस सिलिंडर, केरोसीन तसेच स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

मंदिर परिसरात ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहतुकीस व साठवणुकीस प्रतिबंध
उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
पंढरपूर (दि, 14 ):- कार्तिकी यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात गॅस सिलिंडर, केरोसीन तसेच स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

कार्तिकी यात्रेचा कालावधी दि. 10 ते 24 नोव्हेंबर 2026 असा असून, या कालावधीत पंढरपूर येथे सुमारे 8 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार घाट, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, नामदेव पायरी तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर, केरोसीन व अन्य ज्वालाग्राही पदार्थांची साठवणूक किंवा वाहतूक केल्यामुळे संभाव्य दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दि. 20 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मंदिर परिसरात गॅस, केरोसीन व स्फोटकजन्य पदार्थांची वाहतूक तसेच साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संबंधित व्यापारी, दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📲Get App