🔥 TRENDING रींगस में जनता सिनेमा हॉल के पीछे घास‑... ट्रैक्टर-ट्रॉली ने बाइक को मारी टक्कर,... कष्टीतील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्ष... UPSC Key Focus: Siddis of Gujarat High... खुरसट पुरा में शॉर्ट सर्किट से घर मे ं... Karnataka Accuses E20 Fuel of Excess E...
09 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

किल्ले स्पर्धेतून शिवरायांचा इतिहास जिवंत; मनसेकडून बालगोपाळांचे कौतुक

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 09 Nov 2026, 08:59 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

किल्ले स्पर्धेतून शिवरायांचा इतिहास जिवंत; मनसे नेते दिले बापू धोत्रे यांच्याकडून बालगोपाळांचे कौतुक

पंढरपूर - दिवाळी म्हणले की किल्ले स्पर्धा आलीच. शहरातील अनेक बालगोपाळ, तरुण मित्र, बंधू-भगिनी, वडीलधारी मंडळी हे दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांचे देखावे करत असतात, त्याचबरोबर किल्ल्याची बांधणी देखील करत असतात.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मनसेच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी शहरातील विविध भागात या किल्ल्यांना भेटी देऊन किल्ले बनवणाऱ्या सर्व तरुण-तरुणी, वडीलधारी मंडळी, बालगोपाळांना प्रोत्साहित करण्यात आले.

यावेळी किल्ले बनवणाऱ्या स्पर्धकांशी संवाद साधत त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले. शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरत असून, दिवाळी आनंददायी आणि धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे.
📍 पंढरपूर 09/11/2026
📲Get App