कळवाडी येथे भगवान वीर एकलव्य प्रतिमापूजन व भव्य आदिवासी मेळावा संपन्न
पौराणिक व आदिवासी संस्कृतीचे दर्शन
*कळवाडी येथे भगवान वीर एकलव्य प्रतिमा पूजन व भव्य आदिवासी मेळावा संपन्न*
जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील....मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमा पूजन व भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक सुनील आबा गायकवाड, भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर व ग्रामीण तसेच आदिवासी एकलव्य समाज संघटना होते. कळवाडी ग्रामस्थांनी नामदार गिरीषभाऊ महाजन व उपस्थित मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती भारतीताई पवार या होत्या. यावेळी भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पौराणिक व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध वेशभूषांनी मिरवणुकीची शोभा वाढवली.
या कार्यक्रमास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभाग घेतला. नामदार गिरीषभाऊ महाजन यांनी उपस्थित आदिवासी बांधवांशी संवाद साधत भगवान वीर एकलव्य यांच्या शौर्य, समर्पण आणि ध्येयनिष्ठेला अभिवादन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आदिवासी संघटना पदाधिकारी व हजारो आदिवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.